ऑक्सिजन पातळीसाठी माधव रसायन प्लस उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:26+5:302021-06-18T04:17:26+5:30
कोल्हापूर : सध्या कोरोना महामारीची साथ आहे. या काळात श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि रिसर्च सेंटर तर्फे माधव रसायन, ...

ऑक्सिजन पातळीसाठी माधव रसायन प्लस उपयुक्त
कोल्हापूर : सध्या कोरोना महामारीची साथ आहे. या काळात श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि रिसर्च सेंटर तर्फे माधव रसायन, रस माधव, माधव रसायन प्लसचे या औषधांचे संशोधन करण्यात आले आहे. या औषधांचा लाभ कोरोना व कोरोनासदृश रुग्णांनी होत आहे, अशी माहिती प्रमुख चिकित्सक डॉ. समीर जमदग्नी, संशोधक डॉ. प्रसाद पांडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, गेल्या वर्षी श्री विश्ववतीतर्फे आरोग्यरक्षक फॅमिली केअर क्लिनिक अभियान राबवण्यात आले. यामध्ये ५०० पेक्षा अधिक आरोग्यरक्षक क्लिनिकच्या माध्यमातून माधव रसायन, रस माधव ही औषधे शोधून काढली. ही औषधे कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्र व संपूर्ण भारतात वापरली जात आहेत.
मध्यम ते तीव्र स्वरूपातील कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये क्लिनिकल ट्रायल घेतली असता त्यामध्ये ऑक्सिजनची, आयसीयूची गरज कमी झाली. आयुर्वेदिक डॉक्टरांनी रुग्णांवर उपचाराकरिता या औषधांचा वापर केलेला आहे. श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि रिसर्च सेंटरचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर म्हणाले, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून चिकित्सालयातर्फे संशोधन केलेली औषधे संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना योद्ध्यांना मोफत वितरित करण्यात आली आहेत.
या वेळी रूकडीकर ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर, डॉ. गिरीश शिर्के, सागर कवारे आदी उपस्थित होते.
चौकट
क्लिनिकल ट्रायल
माधव रसायन या औषधाची क्लिनिक ट्रायल सुरू असून माधव रसायन प्लस या औषधाची क्लिनिकल ट्रायल नुकतीच पार पडली आहे, असेही डॉ. पांडकर यांनी सांगितले.