मधुकर बाचुळकर यांच्या वृक्ष वैभव पुस्तकास ‘उत्तम ग्रंथ पुरस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:16 AM2021-07-21T04:16:54+5:302021-07-21T04:16:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नाशिक येथील आयुर्वेद सेवा संघाच्या आयुर्वेद पत्रिकेमार्फत ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ आणि येथील निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नाशिक येथील आयुर्वेद सेवा संघाच्या आयुर्वेद पत्रिकेमार्फत ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ आणि येथील निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या ‘महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव’ या पुस्तकाला ‘उत्तम ग्रंथ पुरस्कार’ मिळाला आहे.
या पुस्तकात ६४ महत्त्वाच्या वृक्षांची सविस्तर आणि शास्त्रीय माहिती देण्यात आली आहे. वृक्षांची शास्त्रीय नावे, विविध भाषेतील नावे, वृक्षांचे मूळ प्रदेश, ते आढळत असणारे प्रदेश, वृक्षांचे शास्त्रीय गुणधर्म, फुले, फळे येण्याचा हंगाम, या वृक्षांचे औषधी व इतर पारंपरिक उपयोग, लागवड पद्धती आणि रंगीत छायाचित्रे या पुस्तकात आहेत. हे पुस्तक डॉ. मधुकर बाचुळकर यांच्याकडे उपलब्ध आहे.
डॉ. अशोक वाली हे सहलेखक आहेत. वैद्य स्वानंद पंडित पुरस्कृत २०२०-२१ साठीचा हा ग्रंथ पुरस्कार असून नाशिकच्या आयुर्वेद सेवा संघाच्या आयुर्वेद पत्रिकेमार्फत दरवर्षी या विषयासंदर्भात पुरस्कार देण्यात येतात, अशी माहिती संघाचे अध्यक्ष वैद्य अंबादास कुलकर्णी आणि प्रकाशक वैद्य अभय कुलकर्णी यांनी दिली आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------
फोटो : 20072021-Kol-Marashtrache vrukshvaibhav.jpg
फोटो ओळी : कोल्हापूर येथील डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या ‘महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव’ या पुस्तकाला ‘उत्तम ग्रंथ पुरस्कार’ मिळाला आहे.
(बातमीदार : संदीप आडनाईक)
200721\20kol_1_20072021_5.jpg
20072021-Kol-Marashtrache vrukshvaibhav.jpgफोटो ओळी : कोल्हापूर येथील डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या ‘महाराष्ट्राचे समृध्द वृक्षवैभव’ या पुस्तकाला "उत्तम ग्रंथ पुरस्कार" मिळाला आहे.