मधुकर जोशी यांचा नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:21 AM2021-02-08T04:21:29+5:302021-02-08T04:21:29+5:30

कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील काळकाई गल्लीतील मधुकर दत्तात्रय जोशी (वय ८६) यांचा पंचगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. शनिवारी ...

Madhukar Joshi drowned in river | मधुकर जोशी यांचा नदीत बुडून मृत्यू

मधुकर जोशी यांचा नदीत बुडून मृत्यू

Next

कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील काळकाई गल्लीतील मधुकर दत्तात्रय जोशी (वय ८६) यांचा पंचगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. शनिवारी नदीपात्रात अंत्यविधी घाटाजवळ त्यांचा मृतदेह मिळाला. तीन दिवसांपासून ते बेपत्ता होते, शोधमोहिमेत शिवाजी पुलावरून त्यांनी नदीत उडी टाकल्याचे तेथील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले होते. त्यानंतर त्यांचा शोध लागला. जुन्या काळातील ते घड्याळ दुरुस्तीचे व्यावसायिक होते.

मधुकर जोशी हे गुरुवारी नातेवाईकांकडे जातो असे सांगून घरातून बाहेर पडले, पण रात्रीपर्यंत परत न आल्याने नातेवाईकांकडून शोधाशोध सुरू होती. जुना राजवाडा पोलिसात बेपत्ताची तक्रार नोंद झाली. शिवाजी पुलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही एका वृध्दाने नदीत उडी टाकल्याचे फुटेज मिळाले. नातेवाईकांनी तेच मधुकर जोशी असल्याचे ओळखले. त्यानंतर शनिवारी अग्निशमन दलाने नदीपात्रात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह अंत्यविधी घाटानजीक मिळाला. ते आपल्या मुलीकडेच राहत होते. जोशी यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो नं. ०७०२२०२१-कोल-मधुकर जोशी (निधन)

Web Title: Madhukar Joshi drowned in river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.