कोल्हापुरात पंचगंगा काठावर १९ फेब्रुवारीला महाआरती, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 11:47 AM2023-02-11T11:47:40+5:302023-02-11T11:48:15+5:30

पंचगंगा नदीकाठाची स्वच्छता, तसेच किरकोळ डागडुजी सुरू

Maha Aarti on February 19 on the bank of Panchganga in Kolhapur, Union Home Minister Amit Shah will come | कोल्हापुरात पंचगंगा काठावर १९ फेब्रुवारीला महाआरती, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार

कोल्हापुरात पंचगंगा काठावर १९ फेब्रुवारीला महाआरती, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार

Next

कोल्हापूर : देशाचे गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत १९ फेब्रुवारीला होणाऱ्या महाआरतीनिमित्त महानगरपालिका प्रशासनाने पंचगंगा नदीकाठाची स्वच्छता, तसेच किरकोळ डागडुजी सुरू केली आहे.

कणेरी येथील सिद्धगिरी मठाच्या वतीने रविवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी पंचगंगा नदीच्या काठावर महाआरतीचे आयोजन केले आहे. पंचगंगा नदीची महाआरती यापूर्वी अनेक वेळा झाली असली तरी यावेळची महाआरती ही भव्य असणार आहे. या महाआरतीत रथीमहारथी सहभागी होणार आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार या महाआरतीत सहभागी होत आहेत.

महाआरतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग व पवडी विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. संपूर्ण पंचगंगेचा काठ स्वच्छ करण्यात आला असून काठावर, पाण्यात असलेली मंदिरे, ओबऱ्या स्वच्छ करण्यात येत आहेत. काठावरील काही फरशा निखळल्या असल्याने त्याची डागडुजी सुरू आहे. नदीकडे जाणारा रस्ता आणि पायऱ्यादरम्यान काँक्रिटीकरण केले जात आहे. काठावरील खराब झालेले लोखंडी ग्रील काढून त्याठिकाणी नवीन बसविले जात आहेत. सर्वच ग्रील रंगविण्यात आले आहेत.

नदीकाठाच्या परिसरात पडलेली खरमाती, देवदेवतांच्या प्रतिमा तेथून हटविण्यात आल्या आहेत. नदीकाठावरील विजेच्या खांबावरील बल्ब बसविण्यात येणार आहेत. त्याठिकाणी जादा बल्बही बसविले जाणार आहेत.

Web Title: Maha Aarti on February 19 on the bank of Panchganga in Kolhapur, Union Home Minister Amit Shah will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.