‘भोगावती शिक्षण’च्या निवडणुकीत महाआघाडी विजयी

By admin | Published: August 31, 2016 12:34 AM2016-08-31T00:34:35+5:302016-08-31T00:36:37+5:30

मोठ्या फरकाने विजय : विरोधी भाजप-रिपाइं आघाडीने जाणवून दिले स्वत:चे अस्तित्व, आता कारखान्याचं बाकी मैदान...

Mahaaghadi won the election of 'Bhogawati Teaching' | ‘भोगावती शिक्षण’च्या निवडणुकीत महाआघाडी विजयी

‘भोगावती शिक्षण’च्या निवडणुकीत महाआघाडी विजयी

Next

भोगावती : अनेक न्याय प्रक्रियेनंतर अखेर भोगावती शिक्षण मंडळाची ही पंचवार्षिक निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, शिवसेना, स्वाभिमानी संघटना, जनता दल यांनी संयुक्त स्थापन केलेल्या महाआघाडीने सर्व १३ जागांवर विजय मिळविला.
विरोधी भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन (आठवले) गटाने आपल्या अस्तित्त्वाची जाणीव करून दिली. भाजपने मिळविलेल्या मतांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करायला लावण्याची वेळ आणली. भोगावती शिक्षण मंडळाची निवडणूक म्हणजे साखर कारखान्याला लाजवेल, अशाप्रकारे झाली.
रविवारी (दि. २८) मतदान झाल्यानंतर सोमवारी लगेचच मतमोजणी घेण्यात आली. सकाळी
८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली, ती मंगळवारी (दि. २९) पहाटे साडेपाच वाजेपर्यंत चालली.
सायंकाळी सात-आठ पर्यंतच्या निकालातच महाआघाडीने सर्व जागांवर वर्चस्व घेतले होते. एकूण १९ हजार ५८९ मतांपैकी ८ हजार २१४ मते फुटीर होती. या मतांची संख्या लक्षणीय राहिल्यामुळे सर्वच उमेदवारांत अगदी शेवटपर्यंत घालमेल सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी शिवराज नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत योग्य प्रकारे प्रक्रिया सुरू राहिली आणि अगदी सुरुवातीपासून निकाल जाहीर होईपर्यंत कोणतेही गालबोट न लागता प्रक्रिया पार पडली.
भोगावती विकास आघाडी -
बळवंत चौगले - कुडुत्री (४९८३), दिलीप कांबळे - कोथळी (४९७९), गजाननराव पाटील - कुरुकली (५०७०), कृष्णा पाटील- वाशी (४७८३), महिपती पाटील - देवाळे (४८६१), सतीश पाटील - कुर्डू (५१०२), प्रा. शहाजी कांबळे - राशिवडे बु।। (५१४२), शामराव गुळवणी - गुडाळ (४७२२), सुभाष जाधव - शिरगाव (५४०१), सुनील रणदिवे - राशिवडे बु।। (५४११), उत्तम तुरंबेकर - पुंगाव (४४०२), विलास जाधव - क।। तारळे (४८८४), विष्णुपंत भाटले - शिरसे (४१५२).
अपक्ष सात उमेदवार लढले
होते. त्यामध्ये तोडणी-ओढणी कामगारांचे अध्यक्ष आबासाहेब चौगले - कुडुत्री यांनी १२५९ मते घेतली, तर मनसेचे अधिकृत रेल्वे इंजिन चिन्हावर लढलेले उत्तम चव्हाण यांनी ९१६ मते घेऊन ताकद दाखवून दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: Mahaaghadi won the election of 'Bhogawati Teaching'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.