‘माधवबाग’तर्फे ताराबाई पार्क येथे आजपासून महाआरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:23 AM2021-03-06T04:23:19+5:302021-03-06T04:23:19+5:30

अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा बायपासचा सल्ला मिळालेल्या किंवा या शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या व्यक्तींसाठी, मधुमेह, ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल, ...

Mahaarogya check-up at Tarabai Park from today by ‘Madhavbagh’ | ‘माधवबाग’तर्फे ताराबाई पार्क येथे आजपासून महाआरोग्य तपासणी

‘माधवबाग’तर्फे ताराबाई पार्क येथे आजपासून महाआरोग्य तपासणी

Next

अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा बायपासचा सल्ला मिळालेल्या किंवा या शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या व्यक्तींसाठी, मधुमेह, ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस आणि स्थूलता या आजाराने त्रस्त असणाऱ्या स्त्री, पुरुषांसाठी, आपल्या आरोग्याबाबत सजग असणाऱ्या नागरिकांसाठी ही महाआरोग्य तपासणी मोहीम एक सुसंधी आहे. या मोहिमेत ‘माधवबाग’चे हार्ट डिसिज रिव्हर्सल एक्सपिरियन्स पॅकेजवर ७० टक्के भरघोस सूट देऊन केवळ ९९९ रुपयांमध्ये ते दिले आहे. त्यामध्ये ईसीजी, आरबीएस, बीपी, एसपीओटू, हार्टरेट, बीएमआय, शारीरिक तपासणी, त्याचबरोबर एम. आय. बी. पल्स ॲपद्वारे आहार आणि व्यायामाविषयी सल्ला देण्यात येणार आहे. चोवीस तासाची ब्लडप्रेशर तपासणी होणारी एबीपीएम तपासणी, हृदयविकाराचे निदान करण्यासाठी उपयुक्त असणारी कॉम्प्युटराईज्ड स्ट्रेस टेस्ट, साखरेची मागील तीन महिन्यांची सरासरी कळणारी एचबीएवन सी तपासणी किंवा रक्तातील कोलेस्ट्रॉल तपासण्यासाठी आवश्यक असणारी लिपिड प्रोफाईल टेस्ट या चार तपासण्यांपैकी नागरिकांच्या आजारानुरूप योग्य असणारी एक तपासणी आणि संपूर्ण हृदयशुद्धिकरण ट्रीटमेंटमधील एक पंचकर्म चिकित्सा यांचा समावेश आहे. ही मोहीम माधवबाग क्लिनिकच्या ताराबाई पार्क शाखेमध्ये (धैर्यप्रसाद हॉलसमोर) होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा करून घ्यावा आणि निरोगी आयुष्य जगावे, असे आवाहन ‘माधवबाग’तर्फे डॉ. विजय बांगर यांनी केले आहे.

चौकट

नावनोंदणी करावी

या मोहिमेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी कोविडचे प्रोटोकॉल पाळावेत. एकाचवेळी गर्दी होऊ नये यासाठी क्लिनिकमध्ये पूर्वनियोजित नावनोंदणी करावी.

Web Title: Mahaarogya check-up at Tarabai Park from today by ‘Madhavbagh’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.