महाड दुर्घटना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली घटनास्थळाची पाहणी
By Admin | Published: August 3, 2016 04:50 PM2016-08-03T16:50:21+5:302016-08-03T16:52:40+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाड येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली असून मदतकार्याचा आढावा घेतला.
ऑनलाइन लोकमत
महाड, दि. ३ - मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पुल मुसळधार पावसात वाहून गेला असून दोन बस व अनेक खासगी वाहने वाहून गेली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाड येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली असून मदतकार्याचा आढावा घेतला.
' मदत व शोधकार्य पूर्ण वेगाने सुरू बेपत्ता वाहने व प्रवाशांचा लवकरात लवकर शोध घेण्यात येत आहे. दरम्यान या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून सक्षम अधिका-यांची नेणूक करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळ असलेला हा पूल मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास वाहून गेला. हा पूल कमकुवत झाला होता. त्यामुळे पोलादपूर वरून महाड कडे येणारी 10 ते 15 वाहने पुलावरून नदीत कोसळली, आणि पुराच्या पाण्यात वाहून गेली असण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान मदत आणि बचाव कार्यासाठी पुण्याहून एनडीआरएफचे बचाव पथक रवाना झाले आहेत. या दोन्ही एसटी बसमध्ये 22 प्रवासी होते. सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल वाहून गेल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. हा पूल १०० वर्ष जुना असल्याची माहिती असून धोकादायक अवस्थेत हा पूल होता.
CM @Dev_Fadnavis in Mahad doing the aerial survey of the bridge collapse tragedy. pic.twitter.com/bropHcaZYi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 3, 2016