मंडलिकांच्या प्रचारापासून ‘महाडिक-भाजप’ लांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:29 AM2019-04-12T00:29:13+5:302019-04-12T00:29:27+5:30

कोल्हापूर : शिवसेना-भाजपची युती होऊन लोकसभेचे रणश्ािंग फुंकल्यानंतर दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी कोल्हापूरचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी हातात हात ...

'Mahadik-BJP' long after the campaigning campaign | मंडलिकांच्या प्रचारापासून ‘महाडिक-भाजप’ लांब

मंडलिकांच्या प्रचारापासून ‘महाडिक-भाजप’ लांब

Next

कोल्हापूर : शिवसेना-भाजपची युती होऊन लोकसभेचे रणश्ािंग फुंकल्यानंतर दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी कोल्हापूरचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी हातात हात घालून काम करायला सुरुवात केली आहे; परंतु मूळ भाजपचे कार्यकर्ते सोडून भाजपकडे आलेले महाडिक समर्थक हे मंडलिक यांच्या प्रचारापासून अलिप्त असल्याचे दिसत आहे. त्यांनी संपूर्ण रसद विरोधी उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी आहे; त्यामुळे भाजपनेही जुन्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा देऊन मंडलिकांसाठी प्रचारयंत्रणा कार्यान्वित केली आहे.
कोल्हापूर मतदारसंघात चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर असे तीन आमदार शिवसेनेचे आहेत, तर कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे आमदार अमल महाडिक आहेत. महाडिक हे जरी भाजपचे असले, तरी त्यांचे चुलत बंधू खा. धनंजय महाडिक हे राष्टÑवादी कॉँग्रेसकडून उभे असल्याने त्यांनी मंडलिकांच्या प्रचारापासून चार हात लांब राहण्याचीच भूमिका घेतली आहे; त्यानुसार भाजपने स्वतंत्ररीत्या यंत्रणा कार्यान्वित करून मतदारसंघात मेळावे, बैठका, घराघरांत संपर्क अशा माध्यमातून प्रचार सुरूठेवला आहे. अमल यांच्या पत्नी शौमिका या भाजपच्या चिन्हावर निवडून येऊन जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या असल्या, तरी त्याही मंडलिकांच्या प्रचारापासून अलिप्त आहेत. तसेच महाडिक समर्थ भाजपचे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक हे धनंजय महाडिकांच्या प्रचारात उघडपणे सक्रिय असल्याचे दिसत आहे. मूळ कार्यकर्ते मात्र युतीधर्म व नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मंडलिकांना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करत आहेत. पालकमंत्री पाटील यांनी म्हणावा तसा वेळ प्रा. मंडलिक यांच्यासाठी दिला नसून, त्यांनी आता कोल्हापूरकडे लक्ष केंद्रित करावे, असा सूर उमटत आहे.

६ विधानसभा मतदारसंघात कोण काय करतंय?
१. कोल्हापूर उत्तर : भाजपचे महेश जाधव, संदीप देसाई, राहुल चिकोडे, अशोक देसाई, आर. डी. पाटील, विजय जाधव, हेमंत आराध्ये, सुभाष रामुगडे, संतोष भिवटे, संपतराव पवार सक्रिय आहेत. महाडिक समर्थक भाजपचे नगरसेवक प्रचारापासून अलिप्त आहेत.
२. कोल्हापूर दक्षिण : जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, दक्षिण समन्वयक राहुल चिकोडे, करवीर तालुकाध्यक्ष पै. संभाजी पाटील, अशोक देसाई, बाजीराव पोवार, आबाजी काशिद, बाबूराव पाटील, सुलोचना नार्वेकर सक्रिय आहेत. जि. प. सदस्या मनीषा टोणपे, दिंडनेर्लीच्या संध्याराणी बेडगे, उचगावचे महेश चौगुले उघडपणे महाडिकांच्या प्रचारात दिसत आहेत.
३. करवीर : तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, सरचिटणीस अनिल देसाई, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार पोवार, गगनबावडा तालुकाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा बॅँक संचालक पी. जी. शिंदे, शिवाजी पाटील, मारुतराव परितकर, भिकाजी जाधव, अमित कांबळे, आदी सक्रिय आहेत.
४. राधानगरी-भुदरगड : मतदारसंघ प्रभारी प्रवीणसिंह सावंत, दीपक शिरगावकर, तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, अल्केश कांदळकर, योगेश परुळेकर, आजरा तालुकाध्यक्ष अरुण देसाई, मलिक बुरुड, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी, नगरसेविका शुभदा जोशी, सक्रिय आहेत. देवराज बारदेस्कर हे महाडिकांच्या प्रचारात दिसत आहेत.
५. कागल : ‘म्हाडा’ पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हा चिटणीस एम. पी. पाटील, तालुकाध्यक्ष संजय पाटील, माजी अध्यक्ष आनंदा मांगले, सरचिटणीस एकनाथ पाटील, परशुराम तावरे, आदी सक्रिय आहेत, तर ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील हे महाडिक यांच्या प्रचारात आहेत.
६. चंदगड : प्रदेश सदस्य गोपाळराव पाटील, तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, गडहिंग्लजचे जि. प. सदस्य हेमंत कोलेकर, अनिल चौगुले, पंचायत समिती सभापती जयश्री तेली, ज्येष्ठ नेते डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, वसंतराव यमगेकर, भावकू गुरव, आदी सक्रिय आहेत.

Web Title: 'Mahadik-BJP' long after the campaigning campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.