Lok Sabha Election 2019 महाडिकांना करवीर, कागल, तर मंडलिकांना चंदगड, उत्तर ‘घातक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:26 AM2019-04-17T00:26:35+5:302019-04-17T00:26:52+5:30

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक हे गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘करवीर’, ‘राधानगरी-भुदरगड’ व ‘दक्षिण’ ...

Mahadik to Karveer, Kaagal, Mandalik to Chandgad, reply to 'deadly' | Lok Sabha Election 2019 महाडिकांना करवीर, कागल, तर मंडलिकांना चंदगड, उत्तर ‘घातक’

Lok Sabha Election 2019 महाडिकांना करवीर, कागल, तर मंडलिकांना चंदगड, उत्तर ‘घातक’

Next

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक हे गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘करवीर’, ‘राधानगरी-भुदरगड’ व ‘दक्षिण’ मतदारसंघातील मताधिक्याच्या बळावर विजयापर्यंत पोहोचले; पण आता परिस्थिती वेगळी असून, त्यांच्या दृष्टीने ‘करवीर’ व ‘कागल’ सर्वांत घातक ठरण्याची शक्यता आहे. विरोधी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासमोर गेल्या निवडणुकीत पाठीशी राहिलेले ‘कोल्हापूर उत्तर’ व ‘चंदगड’ मतदारसंघातील मताधिक्य टिकवणे व उर्वरित ठिकाणी मताधिक्य मिळविण्याचे आव्हान राहणार आहे.
लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत मतदारसंघाची पुनर्रचना होऊन, पूर्वीच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातील राधानगरी-भुदरगड तालुक्यांचा समावेश ‘कोल्हापूर’मध्ये झाला. पुनर्रचित मतदारसंघात राष्टÑवादीने विद्यमान खासदार सदाशिवराव मंडलिक यांना उमेदवारी डावलून संभाजीराजे यांना दिली; त्यामुळे मंडलिक यांनी बंडखोरी केली. शिवसेनेकडून विजय देवणे रिंगणात होते. तिरंगीत झालेल्या लढतीत मंडलिक यांनी बाजी मारत कोल्हापूरच्या राजकारणात इतिहास घडविला. २०१४ च्या निवडणुकीत राष्टÑवादीकडून धनंजय महाडिक, शिवसेनेकडून संजय मंडलिक, तर डाव्या आघाडीकडून संपतराव पवार रिंगणात राहिले. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट असताना महाडिक यांनी ती परतावून लावत राष्टÑवादीचा बालेकिल्ला अभेद्य असल्याचे दाखवून दिले. या निवडणुकीत महाडिक यांच्या मताधिक्यात ‘करवीर’, ‘राधानगरी-भुदरगड’ व ‘कोल्हापूर दक्षिण’चा मोठा वाटा होता. आता पुन्हा याच मल्लांत निकराची झुंज होत आहे. सध्यस्थितीत सहा विधानसभा मदारसंघांपैकी शिवसेनेकडे तीन, भाजपकडे एक आणि राष्टÑवादीकडे दोन आहेत. त्यात कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी हातात ‘धनुष्यबाण’ घेतल्याने मंडलिक यांची हवा तयार झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ही हवा असली तरी ती मतपेटीपर्यंत पोहोचेल का? महाडिक यांनी गेल्या पाच वर्षांत केलेली कामे, अरूंधती महाडिक यांचा महिलांशी असलेला थेट संपर्क आणि महाडिक म्हणून संपूर्ण मतदारसंघात असलेले नेटवर्क यासमोर ही ‘हवा’ टिकाव धरणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. ‘कागल’ व ‘कोल्हापूर’ शहरातील मताधिक्य कोण घेतो, त्यांना कशा प्रकारे रोखले जाते, यावरच निकाल फिरणार हे निश्चित आहे.
पाचव्यांदा कोल्हापूरात : निवडणूक गांभीर्याने
( पान १ वरुन) क्रमप्राप्त राहिले; त्यामुळे इतर पक्षांतील कार्यकर्ते दुखावलेच; पण राष्टÑवादीचे नेते व कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले. त्यातूनच महाडिक यांच्या उमेदवारीला शेवटपर्यंत विरोध झाला. विरोधाचे वातावरण निवळेल, असा अंदाज होता; पण तसे न झाल्याने पवार यांनी दुरुस्त्यांसाठी जोरदार प्रयत्न केले. मुंबईत एक-दोन बैठका घेतल्या, त्याचबरोबर निवडणुकीच्या अगोदर गडहिंग्लज येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांंशी शासकीय विश्रामगृहात संवाद साधला. त्यानंतर वातावरण सुधारत नाही म्हटल्यानंतर दोन्ही कॉँग्रेससह मित्रपक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा रामकृष्ण हॉल येथे मेळावा घेतला. मुक्कामास राहून त्यांनी अनेक जोडण्या लावल्या. ७ एप्रिलला कोल्हापुरात आले होते. दोन दिवस ते मुक्कामास राहिले. ‘कोल्हापूर’ मतदारसंघात कोण काय करतो, काय परिस्थिती आहे, याची रोज माहिती त्यांच्यापर्यंत पुरविणारी यंत्रणा कार्यरत आहे. पक्षांतर्गत विरोध असताना आपण उमेदवारी दिल्याने दगाफटका होऊ नये म्हणून ते सतर्क आहेत.

धनंजय महाडिकांची शक्तिस्थाने : हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, संध्यादेवी कुपेकर, भरमूअण्णा पाटील, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, बजरंग देसाई, संपतराव पवार, रवींद्र आपटे, अशोक चराटी, अरुण डोंगळे, प्रल्हाद चव्हाण, आर. के. पोवार.
संजय मंडलिकांची शक्तिस्थाने
चंद्रकांत पाटील, संभाजीराजे, सतेज पाटील, संजय पवार, विजय देवणे, समरजितसिंह घाटगे, संजय घाटगे, संग्राम कुपेकर, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, दिनकरराव जाधव, विजयसिंह मोरे, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, उत्तम कांबळे.

Web Title: Mahadik to Karveer, Kaagal, Mandalik to Chandgad, reply to 'deadly'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.