महाडिक म्हणतात...‘त्यांच्या’बाबतचा निर्णय वरिष्ठ कॉँग्रेस नेतेच घेतील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:42 AM2019-03-14T10:42:54+5:302019-03-14T10:45:44+5:30

आपण कोणाशी बोललो नाही, ज्यांचा पंतप्रधान करायचा आहे, ते बघतील. त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आपल्या आमदार, पदाधिकाऱ्यांना सांभाळतील, असे खासदार धनंजय महाडिक यांनी येथे पत्रकारांना सांगितले. आमदार हसन मुश्रीफ यांनी आपण सतेज पाटील व दोन्ही कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी काहीही बोललो नाही. खासदार काय बोलले असतील तर मला माहिती नसल्याची टिपण्णी केली होती. त्यावर खासदार महाडिक यांनी असे प्रत्युत्तर देवून सतेज पाटील यांची मनधरणी करणार नसल्याचेच स्पष्ट केले.

Mahadik says ... 'A senior Congress leader will decide on his' decision' | महाडिक म्हणतात...‘त्यांच्या’बाबतचा निर्णय वरिष्ठ कॉँग्रेस नेतेच घेतील 

महाडिक म्हणतात...‘त्यांच्या’बाबतचा निर्णय वरिष्ठ कॉँग्रेस नेतेच घेतील 

Next
ठळक मुद्दे‘त्यांच्या’बाबतचा निर्णय वरिष्ठ कॉँग्रेस नेतेच घेतील  : महाडिक यांची टिप्पण्णीखासदार महाडिक यांची टिप्पण्णी : त्यांचा विरोध अपेक्षितच : मुश्रीफ

कोल्हापूर : आपण कोणाशी बोललो नाही, ज्यांचा पंतप्रधान करायचा आहे, ते बघतील. त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आपल्या आमदार, पदाधिकाऱ्यांना सांभाळतील, असे खासदार धनंजय महाडिक यांनी येथे पत्रकारांना सांगितले. आमदार हसन मुश्रीफ यांनी आपण सतेज पाटील व दोन्ही कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी काहीही बोललो नाही. खासदार काय बोलले असतील तर मला माहिती नसल्याची टिपण्णी केली होती. त्यावर खासदार महाडिक यांनी असे प्रत्युत्तर देवून सतेज पाटील यांची मनधरणी करणार नसल्याचेच स्पष्ट केले.

कॉँग्रेसचे आमदार शिवसेनेच्या, तर भाजपचे आमच्या व्यासपीठावर,अशी विचित्र परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली असून, ती दुरुस्त करण्यास वेळ कशाला घालवायचा..? असा सवाल मुश्रीफ यांनी केला. आमदार सतेज पाटील यांचा विरोध अपेक्षितच होता, त्यांच्यासह वरिष्ठांशी संपर्क साधला नाही; खासदारांनीच साधला असेल तर आपणाला माहिती नसल्याचे आमदार मुश्रीफ यांनी पत्रकारांना सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी खासदार महाडिक यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयात मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आमदार मुश्रीफ म्हणाले, मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक बोलावून त्यांच्या चर्चा करून प्रचाराची रणनीती ठरविली जाणार आहे.

कागलमध्ये आपण, राधानगरी-भुदरगडमध्ये के. पी. पाटील व ए. वाय. पाटील; तर चंदगड मतदारसंघात आमदार संध्यादेवी कुपेकर हे उद्यापासूनच प्रचारास सुरुवात करतील. जिथे राष्ट्रवादीची ताकद कमी आहे, त्या ‘करवीर’मध्ये मधुकर जांभळे, ‘उत्तर’मध्ये आर. के. पोवार, तर ‘दक्षिण’मध्ये स्वत: महाडिक गावागावांत जाणार आहेत. यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील, आर. के. पोवार, आदिल फरास उपस्थित होते.

अमल महाडिक उघड प्रचार करतील

भाजपचे आमदार अमल महाडिक हे खासदार महाडिक यांचे भाऊ आहेत. भाऊ निवडणूकीस उभा राहिल्याने ते उघड प्रचार करतील, त्यात लपविण्यासारखे काय आहे? असे मुश्रीफ यांनी सांगितले.

आघाडीची घोषणा लवकर अपेक्षित

कॉँग्रेससोबतची आघाडी निश्चित असली तरी प्रचारात सक्रिय करण्यासाठी लवकर निर्णय अपेक्षित आहे. आघाडीत शेकाप, जनता दल, रिपाइं (गवई व कवाडे गट) हेही पक्ष असून, त्यांनाही प्रचारात सक्रिय करावे लागणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
 

Web Title: Mahadik says ... 'A senior Congress leader will decide on his' decision'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.