महाडिकसाहेब, भाजपमध्ये या, मंत्री करू! सुरेश हाळवणकर यांचे थेट आवतण : ‘भीमा प्रदर्शन’ सांगता समारंभात टोलेबाजी; पशु-पक्षी पालकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:18 AM2018-01-30T01:18:22+5:302018-01-30T01:18:32+5:30

कोल्हापूर : ‘संसदेमधील अष्टपैलू खासदार’ आहात हे कामातून सिद्ध केले. आता दिशा बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात हात घालून काम करा, मंत्रिपदाने सन्मानित करतो, असे थेट

 Mahadikasaheb, BJP, do this, minister! Directed by Suresh Halwankar: 'Bhima exhibition'; The pride of the birds and the birds | महाडिकसाहेब, भाजपमध्ये या, मंत्री करू! सुरेश हाळवणकर यांचे थेट आवतण : ‘भीमा प्रदर्शन’ सांगता समारंभात टोलेबाजी; पशु-पक्षी पालकांचा गौरव

महाडिकसाहेब, भाजपमध्ये या, मंत्री करू! सुरेश हाळवणकर यांचे थेट आवतण : ‘भीमा प्रदर्शन’ सांगता समारंभात टोलेबाजी; पशु-पक्षी पालकांचा गौरव

Next

कोल्हापूर : ‘संसदेमधील अष्टपैलू खासदार’ आहात हे कामातून सिद्ध केले. आता दिशा बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात हात घालून काम करा, मंत्रिपदाने सन्मानित करतो, असे थेट आवतण सोमवारी भाजपचे महामंत्री आमदार सुरेश हाळवणकर यांनी खासदार धनंजय महाडिक यांना दिले, तर प्रदर्शनासाठी मेरी वेदर मैदान मिळू नये, असा खोडा काही मंडळींनी घातला, पण ‘सच्चाई की अखेर जित होती हैं’, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीने येथेच प्रदर्शन भरविले, असा टोला खासदार महाडिक यांनी लगावला.

भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभात हाळवणकर, महाडिक यांच्यासह ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके यांनी राजकीय टोलेबाजी केली. हाळवणकर म्हणाले, शेतकºयांच्या हृदयातील तुम्ही खासदार आहात. दिशा बदलून नरेंद्र मोदी यांच्या हातात हात द्या, मग निकालाची चिंता करू नका. आपण पक्षाचा महामंत्री आहे, जबाबदारीने बोलतो, तुम्ही भाजपमध्ये यावे मंत्रिपदाने सन्मानित करू, असे आपल्या व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मनात आहे.’

हाळवणकर यांच्या आवतणावर केवळ हसून दाद देत खासदार महाडिक म्हणाले, अकरा वर्षे मेरी वेदरवर प्रदर्शन भरवतोय, पण यावर्षी काहींनी खोडा घातला. महाडिक कुटुंबीय पैसे मिळविण्यासाठी प्रदर्शन भरवत नाहीत, आम्ही स्वत:च्या खिशातील कोट्यवधी रुपये खर्च करतो.’अरुण नरके म्हणाले, संसदेमध्ये नंबर वन, कामातही अग्रेसर हे तुम्हाला जमते कसे? तुम्ही अफलातून खासदार असून, असा खासदार होणे नाही.
 

‘राष्ट्रवादी’ची पाठ
प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आमदार हसन मुश्रीफ आले नव्हते, सांगता समारंभाला राष्टÑवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांना निमंत्रण होते. तेही न आल्याने राष्टÑवादीच्या नेत्यांनी अघोषित बहिष्कार टाकला का? अशी चर्चा सुरू होती.

नेत्यांमध्ये रेड्याचीच चर्चा!
प्रदर्शनात नाचणारा घोडा आणला जातो, पण तुम्ही सन २०१९ ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून नऊ कोटींचा रेडा आणल्याची नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे हाळवणकर यांनी सांगितले. त्यावर, मैदान मिळाले नाही म्हणून रेडा आणल्याची चर्चाही आहे, पण येथील दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठीच रेडा आणल्याचा खुलासा खासदार धनंजय महाडिक यांनी केला.

हाळवणकर यांचा शेट्टींना टोला
भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन ‘आप’चे अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले; पण त्यांचेच आमदार लाभाच्या पदापोटी अपात्र ठरले. आपल्या जिल्ह्यातही एकच विषय घेऊन लढणारा नेता आहे, त्यांच्याकडे दुसरा विषयच नाही, हे दुर्दैवी असल्याचा टोला हाळवणकर यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव घेत लगावला.

‘गोकुळ’ विरोधातील आवाज बंद
‘गोकुळ’वर टीका करून गोरगरिबांची रसद तोडण्याचा प्रयत्न काहींनी केला, त्याला तुम्ही एकच दम दिला आणि त्यांचा ‘गोकुळ’ विरोधातील आवाज बंद झाला, असा टोला हाळवणकर यांनी आमदार सतेज पाटील यांना हाणला.


‘भीमा’ कृषी प्रदर्शनाला आठ लाख शेतकºयांनी दिली भेट
महाराष्टÑासह कर्नाटकातील आठ लाख शेतकºयांनी या प्रदर्शनाला भेट दिली. सांगता समारंभात प्रदर्शनातील जातिवंत पशु-पक्षी पालक व शेतकºयांचा गौरव आमदार हाळवणकर यांनी केला.
हाळवणकर म्हणाले, ऊसतोडीसाठी आठ-दहा शेतकºयांमध्ये लहान ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी केंद्रच्या अनुदानासाठी महाडिक यांनी प्रयत्न करावेत.

खासदार महाडिक म्हणाले, गेल्या साडेतीन वर्षांत कोल्हापुरातील सर्वच प्रश्न मार्गी लावले असून, आठ दिवसांत बास्केट ब्रीजची निविदा निघेल, त्यानंतर दीड वर्षांत कामही पूर्ण होईल. कृत्रिम वीर्य केंद्रासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे पाठपुरावा करु. ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांनी मनोगत व्यक्त केले. रामराजे कुपेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, नानासाहेब महाडिक, संजय घाटगे, आयुक्त अभिजित चौधरी, आदी उपस्थित होते.


Web Title:  Mahadikasaheb, BJP, do this, minister! Directed by Suresh Halwankar: 'Bhima exhibition'; The pride of the birds and the birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.