पाकिटामुळेच देसार्इंकडून महाडिकांचा जयजयकार

By admin | Published: January 26, 2017 12:55 AM2017-01-26T00:55:35+5:302017-01-26T00:55:35+5:30

सतेज समर्थकांची टीका : नको त्यांचा लाळघोटेपणा करू नका

Mahadik's hail | पाकिटामुळेच देसार्इंकडून महाडिकांचा जयजयकार

पाकिटामुळेच देसार्इंकडून महाडिकांचा जयजयकार

Next

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे लोणी व जाडजूड पाकिटामुळेच भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा जयजयकार करत असल्याचा पलटवार बुधवारी आमदार सतेज पाटील यांचे समर्थक नगरसेवक उपमहापौर अर्जुन माने व प्रवीण केसरकर यांनी पत्रकाद्वारे केला. देसाई यांनी पाच झेंडे लावून निवडून येणाऱ्यांनी नीतीमत्ता शिकवू नये, अशी टीका केली होती. त्यास प्रत्युत्तर दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे, ‘देसाई अनेक वर्षे भाजपमध्ये आहेत, परंतु ‘गोकुळ’चे स्वीकृत संचालकपद मिळताच त्यांची नीतीमत्ता गळून पडली. ‘गोकुळ’चे लोणी व जाडजुड पाकिटामुळेच त्यांनी महाडिकांची तळी उचलण्याचे काम सुरू केले आहे. सतेज पाटील यांनी भाजपने निष्ठावंतांना न्याय द्यावा, असे म्हटले होते. हा सल्ला बाबा देसार्इंच्या इतका जिव्हारी लागण्याचे कारण काय..? महाडिकांचा इतिहास बाबांना नक्कीच माहीत असावा. युती शासनाच्या काळात शिवसेनेच्या मंत्र्यांचा गोंडा घोळणारे, नाफ्ता भेसळ प्रकरणातून सुटण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या पुढे-मागे करणारे, खासदारकी मिळविण्यासाठी हसन मुश्रीफ यांचे उंबरे झिजवणारे महाडिक ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ प्रवृत्तीचे आहेत. महाडिकांनी कुणाला टांग मारली नाही, असा नेता जिल्ह्यात शोधून सापडणार नाही. देसाई यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीने भाजपबद्दल बोलणे समजू शकतो; पण महाडिक प्रवृत्तीचे ढोल तेसुद्धा बडवत आहेत. करवीरमध्ये स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांचा पराभव करण्यासाठी महाडिकांनी जंग-जंग पछाडले परंतु जनतेने त्यांना ४६ हजार मतांनी पराभूत केले. खानविलकर यांना पराभूत करण्यासाठी महाडिक यांनी सतेज पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली पण सतेज यांनी काम केल्यानेच जनतेने त्यांना आमदार केले. त्याचे श्रेय महाडिकांना देण्याचा ‘लाळघोटेपणा’ बाबांनी करू नये.


संपतबापूंना दोनदा मदतगेल्या विधानसभेला काँग्रेस नेत्यांचा झालेला पराभव या नेत्यांनी जनमताचा आदर करत स्वीकारला. त्यामध्ये कोण कुणाला दोष देत बसलेले नाही; परंतु लोकसभेला संभाजीराजेंचा घात करणारे व संपतबापूंना दोनदा आमदार करण्यासाठी छुपी चाल खेळणारे महाडिकच होते, हे बाबा देसाई यांनी विसरू नये, असाही टोला पत्रकात लगावला.

Web Title: Mahadik's hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.