आघाडीत महाडिकांचा सिंहाचा वाटा असेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2016 01:06 AM2016-08-15T01:06:35+5:302016-08-15T01:06:35+5:30
धनंजय महाडिक : पालिका निवडणुकीचे रणशिंग फुं कले
कुरुंदवाड : कुरुंदवाड शहराच्या राजकीय, सामाजिक विकासात डांगे यांचे योगदान आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत त्यांच्या आघाडीत महाडिकांचा सिंहाचा वाटा असेल, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी करून पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
येथील शिकलगार वसाहतीतील शिकलगार समाज सांस्कृतिक हॉलच्या पायाभरणीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात महाडिक बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार उल्हास पाटील होते. प्रारंभी महाडिक यांच्या हस्ते सांस्कृतिक भवनाचा पायाभरणी करण्यात आला.
खासदार महाडिक म्हणाले, राजकारणातील भ्रष्ट नीतीमुळे नेते बदनाम होत आहेत. मात्र, महाडिक स्वत:च्या खिशातील पैसा वापरून सामाजिक उपक्रम राबवित असतात. संपूर्ण जिल्ह्यात धनंजय महाडिक युवा शक्ती सक्रिय असून, शंभर टक्के सामाजिक कार्यात असतात. शिकलगार समाजाला सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी रामचंद्र डांगे यांनी घेतलेला पुढाकार स्तुत्य असून, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
आमदार उल्हास पाटील म्हणाले, या सांस्कृतिक भवनासाठी आमदार फंडातून मदत करण्यात येईल. मात्र, या उपेक्षित समाजाने शिक्षणाला महत्त्व देऊन शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव निंबाळकर, माजी नगराध्यक्ष मनीषा डांगे यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास नगराध्यक्ष विमल जोंग, रामभाऊ मधाळे, रवी गायकवाड, अजय भोसले, सलीम दबासे, जोतीराम जाधव, उदय डांगे, अनुप मधाळे, पंडित देसाई, अनिल शिकलगार, राजू निर्मळे, प्रथमेश गायकवाड, आप्पासो मोहिते, किरण जोंग, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक युवराज शिकलगार यांनी केले. (वार्ताहर)