महाद्वार पुन्हा गर्दीने फुलला, शनिवारच्या बाजारात खरेदीला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 07:17 PM2020-11-07T19:17:27+5:302020-11-07T19:24:25+5:30
diwali, kolhapurnews कोरोनासारख्या आपत्तीला धाडसाने तोंड देवून तो परतवून लावत असलेल्या कोल्हापुरकरांनी दिवाळीच्या आधीच्या शनिवारच्या बाजारात खरेदीचा उत्सव साजरा केला. आठ महिन्यांनी पहिल्यांदाच एवढी मोठी गर्दी पुन्हा महाद्वार रोडवर अनुभवायला मिळाली. त्यामुळे रस्त्यावरच्या फेरीवाल्यांपासून ते मोठ्या दुकानदारापर्यंतच्या व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
कोल्हापूर : कोरोनासारख्या आपत्तीला धाडसाने तोंड देवून तो परतवून लावत असलेल्या कोल्हापुरकरांनी दिवाळीच्या आधीच्या शनिवारच्या बाजारात खरेदीचा उत्सव साजरा केला. आठ महिन्यांनी पहिल्यांदाच एवढी मोठी गर्दी पुन्हा महाद्वार रोडवर अनुभवायला मिळाली. त्यामुळे रस्त्यावरच्या फेरीवाल्यांपासून ते मोठ्या दुकानदारापर्यंतच्या व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
मार्च महिन्यात कोरोनाची आपत्ती सुरु झाल्यानंतर लोकांचे बाजारपेठेसारख्या सार्वजनिक ठिकाणी जाणेच बंद झाले. गणेशोत्सवात कोरोनाचा कहर होता. नवरात्रौत्सवापासून तो कमी झाल्यानंतर हळुहळू लोक खरेदीला बाहेर पडू लागले. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव एकदम कमी झाल्याने दिवाळी सणाचा आनंद अधिक द्विगुणीत झाला आहे. लोक खबरदारी घेवून मुक्तपणे सणाच्या खरेदीला बाहेर पडत आहेत.
शनिवारी महाद्वार रोडवर रस्त्यावरचा बाजार भरतो. येथे गरीबातल्या गरीब माणसापासून ते सर्वसामान्य व मध्यमवर्गियांपर्यंतच्या सर्व नागरिकांना हवे तसे कपडे व साहित्य कमी दरात मिळतात. त्यामुळे या बाजाराला नागरिकांची अधिक पसंती असते. यंदा दिवाळीला शनिवारपासून (दि. १४) सुरुवात होत आहे. त्यामुळे हा दिवाळीच्या आधीचा शनिवार असल्याने नागरिकांनी सणाची खरेदी उरकून घेतली. याशिवाय लुगडी ओळ, राजारामपूरी या प्रमुख बाजारपेठेत सायंकाळी मोठी गर्दी होती.