महागावकर कुटुंबीयांकडून रोज १००जणांना जेवणाचे डबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:22 AM2021-05-23T04:22:54+5:302021-05-23T04:22:54+5:30
उपनगरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबातील सदस्य, रस्त्यावरचे फिरस्ते,चौकाचौकात बंदोबस्त करण्यासाठी तैनात पोलीस कर्मचारी वर्ग, गरजू नागरिक यांना मोफत ...
उपनगरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबातील सदस्य, रस्त्यावरचे फिरस्ते,चौकाचौकात बंदोबस्त करण्यासाठी तैनात पोलीस कर्मचारी वर्ग, गरजू नागरिक यांना मोफत जेवणाचे डबे पोहोच केले जातात.
गेले दहा दिवस विनाखंड हा सामाजिक उपक्रम महागावकर कुटुंबातील सदस्य राबवत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी महागावकर कुटुंबीयांनी परिसरात अन्नछत्र संपर्क कार्यालय उभारले असून नागरिकांनी संपर्क करताच तत्काळ जेवण उपलब्ध करून दिले जाते. कोरोना कालावधीत संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत हा उपक्रम चालूच ठेवणार असल्याचे श्रद्धा महागावकर यांनी सांगितले.
फोटो : २२ कळंबा मदत
कोरोना काळात गेले दहा दिवस दररोज शंभर जेवणाचे डबे मोफत वाटण्याचा विधायक सामाजिक उपक्रम जीवबानाना पार्क प्रभागातील श्रद्धा महागावकर कुटुंबातील सदस्यांनी जपला आहे.