म्हाकवे-मत्तिवडे रस्त्याला बाजूपट्ट्यांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:21 AM2021-05-01T04:21:59+5:302021-05-01T04:21:59+5:30
:म्हाकवे-मत्तिवडे या सीमा भागाला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र, मुळात अरुंद असणाऱ्या या रस्त्याच्या दोन्ही ...
:म्हाकवे-मत्तिवडे या सीमा भागाला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र, मुळात अरुंद असणाऱ्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाजूपट्ट्यांचा भराव न केल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देणे अशक्य होत आहे. त्यामुळे हा मार्ग एकरीच बनला असून, संबंधित अधिकाऱ्यांनी व ठेकेदाराने याकडे लक्ष देऊन बाजूपट्ट्यांना भराव करावा, अशी मागणी सीमावासीयांतून होत आहे.
म्हाकवेसह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना कागलकडे जाण्यासाठी जवळचा आणि सीमा भागाला जोडणाऱ्या या रस्त्यासाठी सुमारे ४८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदाच या रस्त्याचे भाग्य उजाळले; परंतु अत्यंत अरुंद आणि बाजूपट्ट्या न केल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
म्हाकवे-मत्तिवडे अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची अशी कोंडी होत आहे.
छाया-दत्तात्रय पाटील.