म्हाकवेकरांना हवे नदीकडून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:27+5:302021-02-06T04:44:27+5:30

आठ हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाच ते सहा पाणी योजना झाल्या. कोट्यवधींचा निधीही खर्ची पडला. मात्र, ...

Mahakvekar wants water from the river | म्हाकवेकरांना हवे नदीकडून पाणी

म्हाकवेकरांना हवे नदीकडून पाणी

googlenewsNext

आठ हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाच ते सहा पाणी योजना झाल्या. कोट्यवधींचा निधीही खर्ची पडला. मात्र, अशुद्ध पाण्याने पाठलाग काही सोडलेला नाही. जोपर्यंत जँकवेलचा जीर्णोद्धार किंवा जलशुद्धीकरण योजना होणार नाही. तोपर्यंत ग्रामस्थांना अशुद्धच पाणी प्यावे लागणार आहे.

दरम्यान, ४८ वर्षांपूर्वी बांधलेल्या तलावाचा वापर नदीकडून पाणी योजना केल्यामुळे काही वर्षांपासून बंद होता. गतवर्षी येथून नव्याने योजना करण्यात आली. त्यामुळे ऐन महापुराच्या काळात गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळाले; परंतु सध्या हे पाणी खराब झाले असून सध्या नदीकडील पाणी शुद्ध आहे. त्यामुळे नदीकडून पूर्ववत पाणी सुरू करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

म्हाकवे येथे तलावातील पाण्याला असा हिरवा रंग प्राप्त झाला आहे.(

छाया - दत्तात्रय पाटील)

Web Title: Mahakvekar wants water from the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.