महालक्ष्मी एक्स्प्रेस तब्बल सतरा तासांनी पोहोचली मुंबईत, प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 12:09 PM2023-03-02T12:09:13+5:302023-03-02T12:09:42+5:30
रेल्वे प्रशासनाने याची कल्पना प्रवाशांना देणे गरजेचे होते. मात्र, ती दिली न झाल्यामुळे अनेकांना मनस्ताप झाला
कोल्हापूर : कोल्हापूरहून मुंबईकडे मंगळवारी रात्री ८.५० वाजता रवाना झालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस तब्बल साडेसात तास उशिराने म्हणजेच बुधवारी दुपारी २.३० वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचली. त्यामुळे या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या नोकरदार व्यावसायिक उद्योजक व अन्य प्रवाशांना मोठ्या मनस्तापासही सामोरे जावे लागले. याबद्दल रेल्वे प्रशासनाकडून काहीच दखल न घेतल्याने प्रवासी संतापले.
ही एक्स्प्रेस मुंबईकडे जाण्यासाठी रवाना झाली. लोहमार्गावरील स्थानके करीत ही रेल्वे सातारा ते कोरेगावदरम्यान मध्यरात्री पोहोचली. यादरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी या रेल्वेला क्रॉसिंगसाठी हिरवा सिग्नल मिळाला नाही. त्यामुळे पुढे ही याच कारणामुळे या रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना सकाळी नऊ वाजता पुणे स्टेशनला पोहोचता आले. तिथेही या मुळातच उशीर झालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला सिग्नल लवकर मिळाला नाही. त्यामुळे सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी मुंबईला पोहोचणारी ही महालक्ष्मी एक्स्प्रेस दुपारी २ वाजता ठाणे रेल्वे स्थानकात पोहोचली आणि तेथून पुढे मुंबईला पोहोचण्यासाठी आणखी ४० मिनिटे म्हणजेच २.४० ही रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचली.
त्यामुळे तब्बल साडेसात तासांहून अधिक या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या अनेक नोकरदारांना रजा टाकावी लागली. व्यापारी उद्योजकांचे ठरलेले व्यवहार न करता आल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. प्रवासी उपचारांकरिता मुंबईत आलेले त्यांनी घेतलेली डॉक्टरांची अपॉइंटमेंट ही कॅन्सल झाली. अनेकांना उपाशी राहावे लागले. पुणे मार्गस्थ होणाऱ्या रेल्वे या ठिकाणी क्रॉसिंगला हिरवा सिग्नल न मिळाल्यामुळे थांबून ठेवल्या जातात. याबाबत रेल्वे प्रशासनाने याची कल्पना प्रवाशांना देणे गरजेचे होते. मात्र, ती दिली न झाल्यामुळे अनेकांना मनस्ताप झाला.
या मार्गावरील सातारा ते कोरेगाव यादरम्यानची दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानंतर या मार्गावर होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेसला सिग्नल मिळण्यास वेळ लागला. आजपासून ही रेल्वे सुरळीत सुरू राहील व प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घेऊ. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे