महालक्ष्मी अन्नछत्रास आता परदेशातूनही निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:47 AM2017-10-13T00:47:02+5:302017-10-13T00:47:13+5:30
कोल्हापूर : श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया परस्थ भाविकांना मोफत अन्नछत्राचा लाभ देणाºया श्री महालक्ष्मी अन्नछत्रास आता परदेशातून निधी मिळविण्यासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया परस्थ भाविकांना मोफत अन्नछत्राचा लाभ देणाºया श्री महालक्ष्मी अन्नछत्रास आता परदेशातून निधी मिळविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने मान्यता दिली आहे. या निधीचा अन्नछत्राचा विस्तार करण्यासाठी निश्चितच उपयोग होईल, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी दिली.
शिस्तबद्ध नियोजन, स्वादिष्ट भोजन, विनम्र सेवा, स्वच्छता यांमुळे श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांचा या महालक्ष्मी अन्नछत्राला वाढता प्रतिसाद मिळत आहे. महिन्याला लाखो भाविक अन्नछत्राचा लाभ घेतात आणि कोल्हापूरच्या दातृत्वालाही सलाम करतात. यापूर्वी संस्थानाला ८० जी अंतर्गत करसवलत मिळाली आहे आणि ‘आयएसओ ९००१-२००८’ मानांकनही प्राप्त झाले आहे. परदेशातून निधी मिळविण्यासाठी अशा पद्धतीचे प्रमाणपत्र मिळणारी ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच सं स्थाआहे. त्यासाठी संस्थेच्या कामाची, विविध सामाजिक उपक्रमांची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविली होती. सर्व निकषांमध्ये संस्था पात्र ठरल्यानेच हे मान्यतापत्र मिळाले आहे.