महालक्ष्मी यात्रेस अमाप उत्साहात प्रारंभ

By admin | Published: May 3, 2015 01:11 AM2015-05-03T01:11:23+5:302015-05-03T01:11:23+5:30

गडहिंग्लजमधील यात्रोत्सव : भव्य मंगल कलश मिरवणूक; दर्शनासाठी गर्दी

The Mahalaxmi Yatra started in the lively energies | महालक्ष्मी यात्रेस अमाप उत्साहात प्रारंभ

महालक्ष्मी यात्रेस अमाप उत्साहात प्रारंभ

Next

गडहिंग्लज : गडहिंग्लज निवासनी श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त हजारो सुवासिनींनी शुक्रवारी सकाळी शहरातून मंगलकलश मिरवणूक काढली. दुपारी पारंपरिक पद्धतीने इरडे पडण्याचा कार्यक्रम व ग्रामदैवतांना गाऱ्हाणे घालण्यात आले. अमाप उत्साहात निघालेल्या अभूतपूर्व मंगलकलश मिरवणुकीनेच देवीच्या यात्रोत्सवास प्रारंभ झाला.
सकाळी ९ वाजता हिरण्यकेशी नदीघाटावर सुवासिनी उत्स्फूर्तपणे एकत्र जमल्या. वरदायी हिरण्यकेशी नदीचे जल भरलेल्या मंगलकलशांची पूजा झाली. त्यानंतर निघालेल्या सवाद्य मिरवणुकीत ‘होणार सून मी या घरची’ या दूरदर्शन मालिकेतील ‘बेबी अत्या’च्या भूमिकेतील पौर्णिमा तळवलकर याही डोक्यावर मंगलकलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
नदीवेस, शिवाजी चौक, बाजारपेठ, बसवेश्वर चौक, मेन रोड, कांबळे तिकटी, आयलँड, लक्ष्मी
रोड मार्गे मिरवणूक मंदिराच्या
आवारात आली. देवीला जलाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सुवासिनींची ओटी भरण्यात आली. अभिनेत्री तळवलकर यांच्याहस्ते मान्यवर महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला.
पारंपरिक ‘पी-डबाक’सह कापशी माद्याळ येथील लेझीम पथक, अकिवाट येथील अविनाश झांजपथक, कागवाडच्या अमर बॅण्ड कंपनीने मिरवणुकीत रंगत आणली.
मिरवणुकीत नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, माजी नगराध्यक्षा मंजूषा कदम, श्रद्धा शिंत्रे, डॉ. मंगल मोरबोळे, अश्विनी मगदूम, यात्रा समिती अध्यक्ष रमेश रिंगणे, देवी लक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कोळकी यांच्यासह पंचमंडळी, हक्कदार व मानकरी सहभागी झाले होते. यात्रेनिमित्त महालक्ष्मी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The Mahalaxmi Yatra started in the lively energies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.