महालक्ष्मीचा ‘गोंधळ’ काळभैरीच्या दारी ! : गडहिंग्लजमधील मंदिर बांधकामाचा वाद वेळ चुकीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:35 AM2018-03-01T00:35:57+5:302018-03-01T00:35:57+5:30
गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि गडहिंग्लजचे ग्रामदैवत काळभैरी मंदिरात नुकतीच चोरी झाली. त्यानंतर येथील महालक्ष्मीयात्रा समितीच्या पुढाकाराने भाविकांच्या देणगीतून ‘श्रीं’च्या मूर्तीसाठी
राम मगदूम।
गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि गडहिंग्लजचे ग्रामदैवत काळभैरी मंदिरात नुकतीच चोरी झाली.
त्यानंतर येथील महालक्ष्मीयात्रा समितीच्या पुढाकाराने भाविकांच्या देणगीतून ‘श्रीं’च्या मूर्तीसाठी नवीन दागिने आणि गाभाºयाच्या सुशोभिकरणाचे काम तातडीने सुरू झाले. त्यामुळे भाविक सुखावले असतानाच मंदिराच्या बांधकामाचा वाद सुरू झाल्याने शांतताप्रिय गडहिंग्लजच्या सलोख्याला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणूनच प्रशासनानेच त्यात हस्तक्षेप करून
हा ‘गोंधळ’ वेळीच थांबविण्याची गरज आहे.
३० वर्षापूर्वी ‘श्रीं’चा दीड किलोचा सोन्याचा मुखवटा चोरीला गेला. त्यानंतर परवाच्या चोरीत जोगेश्वरी देवीच्या मंगळसूत्रासह देवाचे सगळेच दागिने चोरीला गेले. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना धक्का बसला; परंतु महालक्ष्मी
यात्रा समितीच्या पदाधिकाºयांनी पुढाकार घेऊन भाविकांच्या देणगीतून ‘श्रीं’साठी नवीन दागिने बनविण्याचा संकल्प सोडला. त्यामुळे देणग्यांचा ओघही सुरू झाला; परंतु पहिल्याच बैठकीत काही मंडळींनी जीर्णोद्धार समितीवर ‘ताशेरे’ ओढले आणि मंगळवारच्या ग्रामसभेत त्यांच्यावर चक्क ‘हल्लाबोल’ केला. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडून गावातील वातावरण कलुषित होण्याची शक्यता
असल्याने पोलिसांनी व प्रशासनाने त्याची वेळीच नोंद घेणे गरजेचे
आहे. तीन वर्षांपूर्वी श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सुरळीत पार पडली. त्याचे नेटके नियोजन यात्रा समितीने केले. त्याला समस्त गावकºयांसह नगरपालिका आणि सर्वच शासकीय खात्यांनी सक्रीय साथ दिली. लोकवर्गणीतून झालेल्या यात्रेचा जमा-खर्चदेखील ‘समिती’ने तातडीने जाहीर करून सर्वांची वाहवा मिळविली. त्याबद्दल कुणाचेही दुमत नाही.
दरम्यान, यात्रा समितीचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांच्याच पुढाकाराने येथील रिंगणे मळ्यात भक्तांच्या देणगीतूनच अवघ्या दोन वर्षांत
सुमारे सव्वा कोटीचे भव्यदिव्य असेश्री बाळूमामा मंदिर साकारण्यात आले. त्यामुळेच त्यांनी हाक
देताच काळभैरीच्या दागिन्यांसाठीही देणग्यांचा ओघ सुरू झालाआहे; परंतु याच दरम्यान अनेक वर्षांपासून रखडलेल्या काळभैरी
मंदिर ज[र्णोद्धाराचा आणि त्याच्या जमा-खर्चाच्या मुद्द्यावरून नवीन वाद सुरू झाला आहे.
वेळ चुकीची !
दीड तपापासून सुरू असलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्याबद्दल मत-मतांतरे असू शकतात.
लोकवर्गणीतून सुरू असलेल्या या कामाचाही जमा-खर्च मागायला हरकत नाही, तो आतापर्यंत कुणीही मागितलेला नव्हता.
परंतु, मंदिरातील चोरीच्या निमित्ताने त्याचे ‘कवीत्व’ सुरू होणे गडहिंग्लजच्या संस्कृतीला धरून नाही. सध्याच्या भावनिक माहोलात हा वाद गावाला परवडणारा नाही.
उपाय काय ?
देवस्थान उपसमितीनेही जीर्णोद्धाराचा लेखा-जोखा वेळोवेळी जाहीर करणे क्रमप्राप्त आहे. तसे न झाल्यामुळेच ही वेळ आली आहे. त्यामुळे हिशेब जाहीर करण्याबरोबरच मंदिर बांधकामाच्या पूर्ततेचा कालबद्ध कृती कार्यक्रम जनतेसमोर ठेवण्याची गरज आहे, हाच या वादावरील उपाय आहे.
महालक्ष्मी मंदिराचा निधी का परत गेला ?
आमदार मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने गडहिंग्लजमधील सहा धार्मिकस्थळांच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मिळाला होता.
मात्र, महालक्ष्मी देवस्थान समिती, यात्रा समिती आणि नगरपालिका यांच्यातील वादामुळेच लक्ष्मी मंदिरासाठी मिळालेला एक कोटीचा निधी परत गेला.तो कुणामुळे गेला, त्याला जबाबदार कोण ? याचे
उत्तर गडहिंग्लजकर अजून शोधत आहेत. अशावेळी काळभैरी मंदिर बांधकामाचा वाद उपस्थित होणे उचित नाही.