पाणी संस्थांना महावितरणच्या ‘इंंधन अधिभार’चा झटका

By admin | Published: August 13, 2015 12:15 AM2015-08-13T00:15:38+5:302015-08-13T00:15:38+5:30

वीज आकार एवढा इंधन आकार : स्थिर आकारातूनही होतेय लूट; जिल्ह्यातील पाणीपुरवठा संस्था टिकणार काय?

Mahanvitaran's fuel surcharge blow to water bodies | पाणी संस्थांना महावितरणच्या ‘इंंधन अधिभार’चा झटका

पाणी संस्थांना महावितरणच्या ‘इंंधन अधिभार’चा झटका

Next

प्रकाश पाटील - कोपार्डे  वाकरे (ता. करवीर) येथे केदारलिंग सहकारी पाणीपुरवठा संस्थेने डिसेंबर २०१४ पासून वापरलेल्या वीज आकारावर लावलेला वाढता इंधन अधिभार सचिवांनी संचालक मंडळाच्या लक्षात आणून दिल्यानंतर ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा सौदा’ अशीच महावितरणच्या वसुलीच्या बाबतीत स्थिती असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पाणीपुरवठा संस्था कशी चालवायची, हा यक्षप्रश्न आहे. ही एकाच संस्थेबद्दलची महावितरणची आकारणी नसून, सर्वच संस्थांच्या बाबतीत असल्याने जिल्ह्यातील पाणीपुरवठा संस्था टिकणार काय? हा प्रश्न आहे.
केदारलिंग पाणीपुरवठा संस्थेने आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात नदीवर पाणी उपशासाठी विद्युत मोटार बसविली. नंतर त्यांना वीज आकार २१ हजार ७४४, तर इंधन आकार ७ हजार ३८९ रुपये आला. नोव्हेंबरमध्ये वीज आकार ३१ हजार १४५, तर इंधन आकार ४ हजार ७५४ रुपये आला. यानंतर इंधन आकारात मोठी वाढ झाली. डिसेंबरमध्ये वीज आकार १९ हजार ९७ तर इंधन अधिभार १४ हजार २६०, जानेवारीमध्ये वीज आकार ४३ हजार २१९ तर इंधन अधिभार २२ हजार ८१४, तर एप्रिलमध्ये वीज आकार ३३ हजार ६९५ तर इंधन अधिभार २६ हजार ९८२ रुपये आकारण्यात आला.
या महिन्यात ५७ रुपये ६ पैसे प्रतियुनिट इंधन अधिभार बसत असल्याने संस्था चालवायच्या कशा, असा प्रश्न या संस्थाचालकांना पडला आहे.


यावर्षी सुरुवातीपासून इंधन अधिभार, इतर आकार, मीटर रिडिंगपेक्षा जादा वीज आकार कळवून बिल देणे असे प्रकार सर्रास चालू आहेत. हे जिल्ह्यातील सर्वच पाणीपुरवठा संस्थांच्या बाबतीत महावितरणकडून चालू आहे. आमच्या सचिवांमुळे आमच्या हे लक्षात आले आहे. मात्र, विचारणा केल्यास दाद दिली जात नाही. त्यामुळे पाणीपुरवठा संस्था टिकणे अवघड आहे.
- सुभाष महादेव पाटील, अध्यक्ष केदारलिंग पाणीपुरवठा, वाकरे

कर्मचाऱ्यांकडून दखल नाही
डिस्प्ले गेला होता म्हणून जानेवारीत मीटर महावितरणने बदलले. यावेळी मीटरप्रमाणे २१ हजार ८७५ युनिट वीज वापर झाल्याप्रमाणे १५ हजार ७३४ रुपयांचे बिल दिले होते. मात्र, याच बिलात पुन्हा ३८ हजार २११ युनिट जादा वीज वापर दाखवून संस्थेला २७ हजार ४८५ रुपये वीज आकार भरण्यास सांगितले. त्याशिवाय इंधन अधिभार २२ हजार ८१४ रुपये आकारण्यात आला होता. अशी मनमानी आकारणी करून या पाणीपुरवठा संस्था आर्थिक अडचणीतच ढकलल्याचा आरोप सचिव संजय कुंभार यांनी केला. ही जादाची आकारणी का? मीटर रिडिंगप्रमाणे आमचे बिल घ्या, अशी विचारणा केल्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दाद घेतली जात नाही, असेही कुंभार यांनी सांगितले.

मीटर काढून घ्यावे
'नोव्हेंबर महिन्यात मीटरचा डिस्प्ले गेला होता. यावेळी महावितरणकडून सरासरी वीज वापर इतका २५ हजार ७५० युनिट वापर कळविला. त्यापोटी १८ हजार ५२१ रुपये आकारणी बरोबर १७ हजार ५५० युनिट तुम्ही जादा वापर केला असल्याचे कळवत १२ हजार ६२३ रुपये त्याच बिलात आकारणी केली. याबाबत संस्थेला कोणतीही कल्पना दिली नाही. संस्थेने मात्र पावसाळा जवळ आल्याने मीटर काढून घ्यावे, अन्यथा खराब होण्याची भीती लेखी कळविली होती.

Web Title: Mahanvitaran's fuel surcharge blow to water bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.