महिषासुर मर्दिनी अंबाबाई अष्टमीनिमित्त महापूजा; दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 22, 2023 05:07 PM2023-10-22T17:07:35+5:302023-10-22T18:08:07+5:30
महिषासुर रेड्याचे रूप घेऊन देवीशी युद्ध करू लागला. देवीने रेड्यावर पाय देऊन, त्याच्या कंठावर शूलाने वार केला.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला रविवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधण्यात आली. अष्टमीनिमित्त मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होती.
प्राचीन काळी देव आणि असुर यांच्यात १०० वर्षे घोर युद्ध झाले. असुर प्रमुख महिषासुराने देवांचा राजा इंद्र, यांचा पराभव करून त्यांचे राज्य जिंकले. त्याने सूर्य,अग्नि, चंद्र, यम बरूण या सर्वांचे अधिकार काढून घेऊन तो स्वतःन सर्वांचा अधिष्ठाता झाला.सर्व पराभूत देव ब्रह्मदेवाला घेऊन, भगवान शंकर आणि विष्णू यांच्याकडे गेले, त्यांनी सर्व वृत्तांत कथन केला, त्यावेळी सर्व देवांच्या शरीरातून तेज बाहेर पडले, ते सर्व तेज एकत्र होऊन; एका स्त्री देवतेच्या रूपात प्रगट झाले. या देवीला पाहून देवांनी तिचा जयजयकार केला. विविध देवांनी आपल्याकडील शो देवीला दिली.
महिषासुर रेड्याचे रूप घेऊन देवीशी युद्ध करू लागला. देवीने रेड्यावर पाय देऊन, त्याच्या कंठावर शूलाने वार केला, तेव्हा तो महिषासुर स्वतःच्या मुखातून पुरुषार्थ रुपाने बाहेर पडत असताना, देवी मातेने त्याचा तलवारीने शिरच्छेद केला. श्रीदेवी मातेने महिषासुरासह अनेक राक्षसांचा संहार करून त्रिलोक्याचे रक्षण केले. या प्रसंगावर आधारित नवरात्र उत्सवात अष्टमीला असणारी"महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा श्रीपूजक निलेश ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी साकारलेली आहे.