महापुराचा जिल्ह्याला २४३ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:26 AM2021-07-27T04:26:06+5:302021-07-27T04:26:06+5:30

कोल्हापूर: २०१९ चा प्रलंयकारी महापूर आणि त्यापाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीत आता या महापुराने आणखी २४३ कोटींची भर ...

Mahapura hits district with Rs 243 crore | महापुराचा जिल्ह्याला २४३ कोटींचा फटका

महापुराचा जिल्ह्याला २४३ कोटींचा फटका

googlenewsNext

कोल्हापूर: २०१९ चा प्रलंयकारी महापूर आणि त्यापाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीत आता या महापुराने आणखी २४३ कोटींची भर घातली आहे. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अंदाजातून हे वास्तव पुढे आले आहे. २०१९ इतकाच हा महापूरदेखील विध्वंसकारी ठरल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात ४११ गावे व ५८ हजार हेक्टर शेती पूरबाधित आहेत. महापुरामुळे ४५ हजार २२० नागरिकांचे स्थलांतर झाले असून यातील १६ हजार ३९९ स्थलांतरित निवारा कक्षात आहेत. पुरामुळे आतापर्यंत ७ जण मृत्यू पावले आहेत. यात पाण्यात वाहून जाण्याबरोबरच घर कोसळल्यामुळेही झालेल्या मृत्यूचा समावेश आहे.

दोन तीन दिवसांच्या तुफानी पावसानेच जिल्ह्यात २०१९सारखी पूरस्थिती निर्माण केली. आता महापूर ओसरू लागला असलातरी त्याची गती कमी आहे. पाऊस कमी झाला आहे, ऊन पडले आहे, एवढाच काय तो या संकटाच्या काळात नागरिकांना दिलासा आहे. बाकी या महापुराने पुराने बाधित झालेल्याचा संसारच उघड्यावर आणला आहे. घर, व्यवसाय, शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. आता पूर ओसरेल तसे नुकसानीचे मोजमाप सुरू होणार आहे. जसजसे पंचनामे होतील तसतसा नुकसानीच्या आकड्यात भरच पडत जाणार आहे.

चौकट

१०४ पशुधन दगावले

या महापुरात १०४ पशुधन दगावले आहे. २०१९च्या पुराच्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्के असलेतरी नागरिकांचा गाफीलपणा या मुक्या जनावरांना नडला आहे. या महापुरात ८ हजार ८०६ जनावरे स्थलांतरित केली आहेत. त्यांना छावण्यांच्या माध्यमातून चारा व पशुखाद्याचा पुरवठा केला जात आहे.

चौकट

महावितरणचे २३ कोटींचे नुकसान

जोरदार वाऱ्यासह ढगफुटीसारख्या पडलेल्या पावसाचा सर्वात माेठा फटका महावितरणला बसल्याचे दिसत आहे. बरेच डीपी, टीसी पाण्यामध्ये आहेत. तारा तुटून पडल्या आहेत, तर विद्युत पोल पूर्णपणे मोडून पडले आहे. काही ठिकाणी तर गाळात पूर्णपणे रुतून बसले आहेत. यंत्रणाच तुटून पडल्याने महावितरणला २३ कोटी ११ लाख ३२ हजारांचे नुकसान सोसावे लागले आहेत. अजूनही पूर ओसरलेला नसल्याने खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करणे हे मोठे दिव्य झाले आहे. तरीदेखील दोन लाखावर ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला असून एक लाखावर ग्राहक अजूनही अंधारात आहेत.

चौकट

ग्रामीण पाणीपुरवठा अजून ठप्पच

जॅकवेल, पाण्याच्या मोटारी, डीपी पाण्यात बुडाल्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जिल्ह्यातील ४८७ गावांतील पाणीपुरवठा बंद आहे. आतापर्यंत केवळ ३० गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले आहे. १३७ गावातील पुरवठा सुरू होण्यास अजून दोन दिवस लागणार आहेत. तसेच पुढील पाच दिवसात उर्वरित ३२० गावातील पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याचे यंत्रणेचे प्रयत्न आहेत.

Web Title: Mahapura hits district with Rs 243 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.