कोल्हापूर शहरातील महापुराची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:16 AM2021-07-24T04:16:04+5:302021-07-24T04:16:04+5:30

- कोल्हापुरातील महापुराची स्थिती २०१९ च्या महापुरापेक्षा गंभीर. - एनडीआरएफची तीन पथके बचावकार्यात सहभागी, आणखी चार पथके येणार. - ...

Mahapura situation in Kolhapur city | कोल्हापूर शहरातील महापुराची स्थिती

कोल्हापूर शहरातील महापुराची स्थिती

Next

- कोल्हापुरातील महापुराची स्थिती २०१९ च्या महापुरापेक्षा गंभीर.

- एनडीआरएफची तीन पथके बचावकार्यात सहभागी, आणखी चार पथके येणार.

- महापालिकेची सहा पथके गुरुवारी रात्रीपासून बचाव कार्यात कार्यरत

- राधानगरी, तुळशी धरणाचे दरवाजे उघडले नसतानाही ५५ फुटांवर पंचगंगा नदीची पातळी.

- सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पातळी आठ फूट सात इंचांनी वाढली.

- २०१९ मध्ये पूरपातळी ५७ फूट होती, आता ती ५४ फूट ८ इंचावर पोहचली, पाणी वाढत आहे.

- कोल्हापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा बेमुदत बंद, सर्व यंत्रे महापुराच्या पाण्यात.

- कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागातून २९० कुटुंबांतील १०१९ नागरिकांना विस्थापित करण्यात आले.

- विस्थापित कुटुंबांची महापालिकेच्या निवारा केंद्रात राहण्याची सोय.

- कोल्हापूर शहरातील पन्नासपेक्षा जास्त रुग्णालयांतील १०० हून अधिक रुग्ण अन्यत्र हलविले.

- जोराचा पाऊस झाल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणी, वाहतुकीची प्रचंड कोंडी.

- कोल्हापूर - पुणे, कोल्हापूर - सांगली , कोल्हापूर - बेळगाव, कोल्हापूर - रत्नागिरी रस्ते बंद.

पालकमंत्री बनले स्वयंसेवक

गुरुवारी रात्री कोल्हापुरात पोहचलेल्या पालकमंत्री सतेज पाटील यांनी उशिरापर्यंत अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, महापुरासंबंधी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच बचाव कार्याबाबत मार्गदर्शन केले. शुुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील तसेच ग्रामिण भागातील नागरिकांच्या बचाव कार्याबाबत ते सतत माहिती घेत होते. रमणमळा, महावीर कॉलेज परिसरात पालकमंत्री पाटील स्वत: एखाद्या स्वयंसेवकांसारखे पाण्यात उतरून नागरीकांना मदत करत होते. महावीर काॅलेजमागील सर्व नागरिक पाण्यातून बाहेर काढेपर्यंत ते त्या ठिकाणी थांबून होते.

Web Title: Mahapura situation in Kolhapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.