महारॅलीने अवयव दानाविषयी जागृती

By admin | Published: August 31, 2016 12:32 AM2016-08-31T00:32:49+5:302016-08-31T00:36:15+5:30

घोषणांनी परिसर दुमदुमला : राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआरतर्फे आयोजन

Maharali Awakening of organ donation | महारॅलीने अवयव दानाविषयी जागृती

महारॅलीने अवयव दानाविषयी जागृती

Next

कोल्हापूर : ‘अवयव दान श्रेष्ठ दान’, ‘गणपती बाप्पा मोरया - अवयव दान करूया’, ‘अवयवदान आयुष्य जगायला आणखी एक संधी, सबसे महान अवयव दान’ अशा घोषणा देत मंगळवारी अवयव दानाविषयी जागृती करण्यासाठी महारॅली काढण्यात आली.
येथील दसरा चौकातून सुरू झालेल्या महाअवयव दान अभियान महारॅलीचा प्रारंभ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एन. शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रकाश पाटील उपस्थित होते.
या महारॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी अवयव दानाविषयी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. अवयव दानाने मृत्यूच्या उंबरठ्यावर असणाऱ्यांना जीवन जगण्याची संधी मिळते शिवाय मृत्यूनंतरही आपण अवयव दानाच्या स्वरुपात दुसऱ्याच्या शरीरात जिवंत राहू शकतो. अवयव दानाच्या या उदात्त कार्याला जात, धर्म, लिंग यांचे बंधन नाही. यामुळे अवयव दानासाठी मोठ्या प्रमाणात पुढे यावे, असे आवाहन या महारॅलीद्वारे करण्यात आले. ही रॅली पुढे आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महानगरपालिका, सीपीआरमार्गे दसरा चौकात आली. यावेळी शासकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.
आज, बुधवारी या अभियानांतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये निबंध, वक्तृत्व, रांगोळी या स्पर्धा घेण्यात येणार आहेत आणि ३१ सप्टेंबरला विविध ठिकाणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.


रॅलीत यांचा सहभाग
रलीत छत्रपती राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, जगद्गुरू पंचाचार्य होमिओपॅथिक महाविद्यालय, वेणूताई चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, शिवाजी विद्यापीठातील एनएसएस विभाग, महावीर महाविद्यालय, शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन या संस्थांचा सहभाग होता. याशिवाय जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्येही महारॅलीचे आयोजन करण्यात आले.

कोल्हापुरातील दसरा चौकात मंगळवारी झालेल्या अवयव दान रॅलीचा प्रारंभ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. देवानंद शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या छायाचित्रात अवयव दान जागृतीचे फलक लावलेली बस नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.

Web Title: Maharali Awakening of organ donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.