Maharashtra Assembly Election 2019 : रविकांत तुपकर पुन्हा ‘स्वाभिमानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:31 PM2019-10-17T13:31:36+5:302019-10-17T13:34:07+5:30

स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सदाभाऊ खोत यांच्याशी संधान बांधलेले रविकांत तुपकर १९ दिवसांनी पुन्हा स्वाभिमानीत परतले.कोल्हापुरात राजू शेट्टी यांनी छातीवर बिल्ला आणि गळ्यात उपरणे घालून त्यांचे संघटनेत स्वागत केले.

Maharashtra Assembly Election 2019: Ravikant Tupkar again 'Swabhimani' | Maharashtra Assembly Election 2019 : रविकांत तुपकर पुन्हा ‘स्वाभिमानी’

Maharashtra Assembly Election 2019 : रविकांत तुपकर पुन्हा ‘स्वाभिमानी’

Next
ठळक मुद्देरविकांत तुपकर पुन्हा ‘स्वाभिमानी’राजू शेट्टी यांनी लावला बिल्ला : चूक झाल्याची कबुली

कोल्हापूर : स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सदाभाऊ खोत यांच्याशी संधान बांधलेले रविकांत तुपकर १९ दिवसांनी पुन्हा स्वाभिमानीत परतले.कोल्हापुरात राजू शेट्टी यांनी छातीवर बिल्ला आणि गळ्यात उपरणे घालून त्यांचे संघटनेत स्वागत केले.

संघटना सोडणे ही आयुष्यातील सर्वांत मोठी चूक असल्याचे तुपकर यांनी, तर कुटुंबप्रमुख म्हणून वडीलकीच्या नात्याने माफ करून परत घेतले आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. संघटनेंतर्गत असलेल्या वादामुळेच राजीनामा दिला होता, आता त्यावर पडदा पडला आहे, असे दोघांनीही स्पष्ट केले.

गेल्या महिनाअखेरीस राजीनामा देऊन अनपेक्षित धक्का देणाऱ्या तुपकरांनी बुधवारी स्वाभिमानीत परत येऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. कोल्हापुरात दुपारी झालेल्या पत्रकार बैठकीत राजू शेट्टी यांनी घोषणा करताना, संघटनेंतर्गत कुरबुऱ्यांमुळे रागाच्या भरात हा निर्णय घेतला होता. आता त्यांची चूक त्यांना उमगली आहे.

शेतकरी चळवळीपेक्षा कोणी मोठा नाही, याचे भान त्यांना लवकर आले. आजच्या घडीला ही चळवळ टिकविणे महत्त्वाचे आहे. तुुपकर यांच्यासारख्या बिनीच्या शिलेदाराची गरज आहे. पुन्हा एकदा ताठ मानेने काम करतील, असे सांगितले.

तुपकर यांनी आपली भूमिका मांडताना अंतर्गत वाद सोडविले नसल्यानेच रागातून बाहेर पडलो होतो. सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या नसतात, हे शेट्टी यांच्या मुशीत राहून शिकलो असल्याने फार काही बोलणार नाही; पण संघटना सोडण्याची चूक उमगली आहे. त्याचा पश्चाताप होत असून, संघटनेत कोणतेही पद न घेता सामान्य कार्यकर्ता म्हणूनच महाराष्ट्रभर संघटना पोहोचविण्यासाठी काम करणार आहे, असे सांगितले. यावेळी स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, राज्य प्रवक्ते अनिल पवार, पंढरीनाथ मांडरे, बापूसाहेब कारंडे, रमेश भोजकर, स्वस्तिक पाटील उपस्थित होते.

तुपकर परत का आले

तुपकर संघटना सोडून का गेले, याचे उत्तर त्यांनी राजीनामा देतानाही कळले नव्हते, अंतर्गत वाद असल्याचे ते आता सांगत असले तरी खरे कारण उघड झालेलेच नाही. आता संघटनेत परत आल्यानंतरही ते परत का आले याचे उत्तरही कोणी द्यायला तयार नाही. पत्रकार बैठकीत देखील त्यांना खोदून खोदून विचारले तरी त्यांनी उत्तर देणे टाळले; त्यामुळे ते गेले का आणि परत आले का हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

काटेही लवकरच परत येतील

मला सांगूनच तुपकर संघटनेतून बाहेर पडले, मला विचारूनच परत आले. भगवान काटे मला न विचारता गेले आहेत; पण त्यांना स्वत: मीच परत आणणार आहे. त्यांची लवकरच समजूत काढणार आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ मार्गदर्शकाची चळवळीला गरज आहे. त्यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा अजून स्वीकारलेला नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.

 

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Ravikant Tupkar again 'Swabhimani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.