Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
By समीर देशपांडे | Updated: October 27, 2024 09:15 IST2024-10-27T09:13:26+5:302024-10-27T09:15:14+5:30
गेले १५ दिवस येथील उमेदवारीवरून घोळ सुरू होता. क्षीरसागर हे उद्या सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
कोल्हापूर : महायुती तर्फे कोल्हापूर उत्तर मधून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. रात्री अडीच वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्षीरसागर आणि सत्यजित कदम यांच्यात झालेल्या चर्चेत हा निर्णय झाला आहे. कदम यांनाही बंडखोरीपासून परावृत्त करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार राजेश लाटकर विरुद्ध महायुतीचे शिवसेनेचे राजेश क्षीरसागर असा सामना रंगणार आहे.
गेले १५ दिवस येथील उमेदवारीवरून घोळ सुरू होता. क्षीरसागर हे उद्या सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत.