करवीर मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांची १३.७९ कोटींची मालमत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 01:34 PM2024-10-30T13:34:59+5:302024-10-30T13:35:15+5:30
दोन बँकांचे २.२२ कोटींचे कर्ज
कोल्हापूर : माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मंगळवारी ‘करवीर’ विधानसभा मतदारसंघातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या संपत्ती विवरणपत्रात १३ कोटी ७९ लाख ४६ हजार ५१७ रुपयांची कुटुंबाची मालमत्ता असल्याचे दाखवले आहे. नरके यांच्या नावावर सर्वाधिक ९ कोटी ८६ लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्यावर दोन बँकांचे २ कोटी २२ लाख ६१ हजार ७१८ रुपयांचे कर्ज आहे.
चंद्रदीप नरके यांच्या जंगम मालमत्तेचे मूल्य १ कोटी ३० लाख १४ हजार ३०२ रुपये आहे. त्यांच्याकडील स्थावर मालमत्तेमध्ये स्वसंपादित केलेल्या मालमत्ता खरेदीची किंमत ३ कोटी ५ हजार ९४१ रुपये आहे, तर वारसाप्राप्त मालमत्ता ५ कोटी ५५ लाख ८२ हजार ५६२ रुपयांची त्यांच्याकडे आहे.
चंद्रदीप नरके यांच्यासह कुटुंबाची मालमत्ता अशी
नाव - जंगम - स्थावर
- चंद्रदीप नरके - १ कोटी ३० लाख १४ हजार ३०२ - ८ कोटी ५५ लाख ८८ हजार ५०३
- राजलक्ष्मी नरके (पत्नी) - ९५ लाख ७२ हजार ४०० - १ कोटी ९ लाख ४४ हजार ८४३
- ऐश्वर्या पोळ (मुलगी) - १ लाख ३५ हजार ५०६ - ४८ लाख ६२ हजार ४३०
- देविका फाटक (मुलगी) - ९ लाख ९६ हजार ००८ - २७ लाख २२ हजार १६०
- देवराज नरके (मुलगा) - २३ लाख ३२ हजार ७६५ - ७७ लाख ७७ हजार ६००
- एकूण - २ कोटी ६० लाख ५० हजार ९८१ - ११ कोटी १८ लाख ९५ हजार ५३६
चंद्रदीप नरके यांचे शिक्षण
एस. एस. सी. : स. म. लाेहिया हायस्कूल काेल्हापूर (१९८२)
एच. एस. सी : न्यू कॉलेज, काेल्हापूर (१९८४)
बी. ई. (सिव्हिल) : वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली (१९९१)