Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात बंदोबस्तासाठी आठ हजार पोलिस, जवानांचा फौजफाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 05:24 PM2024-11-18T17:24:17+5:302024-11-18T17:25:23+5:30

कर्नाटक होमगार्डसह केंद्रीय सशस्त्र दलाचा सहभाग, उपद्रवी मतदान केद्रांवर सशस्त्र जवान

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 8000 policemen and jawans have been deployed for security in Kolhapur district | Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात बंदोबस्तासाठी आठ हजार पोलिस, जवानांचा फौजफाटा

Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात बंदोबस्तासाठी आठ हजार पोलिस, जवानांचा फौजफाटा

कोल्हापूर : विधानसभेसाठी बुधवारी (दि. २०) होणारे मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलिसांसह राज्यातील विविध ठिकाणांहून आलेले पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे सशस्त्र जवान सज्ज झाले आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान ८ हजार १५७ पोलिस आणि जवानांचा खडा पहारा राहणार आहे. उपद्रवी केंद्रांवर सशस्त्र दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत. मंगळवारी (दि. १९) दुपारीच बंदोबस्त मतदान केंद्रांकडे रवाना होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.

मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन केले आहे. जिल्ह्यातील उपद्रवी केंद्रांची स्वतंत्र यादी केली आहे. विशेषत: कागल, कोल्हापूर दक्षिण, उत्तर, इचलकरंजी या मतदारसंघांवर पोलिसांची करडी नजर आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती होत असल्याने काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवण्याचा धोका आहे. यातील काही उपद्रवी केंद्रांवर पोलिसांसह केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत.

यापूर्वी निवडणुकांमध्ये वाद, गोंधळ झालेल्या गावांमधील राजकीय नेते, राजकीय गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही अधीक्षक पंडित यांनी दिला आहे.

मतदान केंद्रांवर मोबाइल बंदी

मतदारांना मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन जाता येणार नाही. पोलिस आणि मतदान कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कोणी मोबाइलवर मतदानाचे व्हिडीओ केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत असे प्रकार घडल्याने यावेळी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.

असा असेल बंदोबस्त

  • कोल्हापूर पोलिस - २५५०
  • मुंबई, लोहमार्ग, तुरची प्रशिक्षण केंद्रातील पोलिस - ८००
  • कोल्हापूर होमगार्ड - ४४७
  • कर्नाटक होमगार्ड - ३३६०
  • (बेळगाव, बागलकोट, हसन, कोलार, कारवार, बंगळुरू, म्हैसूर येथील होमगार्ड)
  • सीएपीएफ - ६ कंपन्या
  • एसएपी - ३ कंपन्या
  • एसआरपीएफ - १ कंपनी
  • (प्रत्येक कंपनीत १०० जवान)

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 8000 policemen and jawans have been deployed for security in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.