माजी पालकमंत्र्यांकडून माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न, राजेश क्षीरसागर यांचा आरोप

By समीर देशपांडे | Published: November 21, 2024 06:07 PM2024-11-21T18:07:54+5:302024-11-21T18:10:33+5:30

'मी परिस्थिती पाहून शांत राहण्याचा निर्णय घेतला'

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 An attempt to attack me by the former Guardian Minister Allegation of Rajesh Kshirsagar | माजी पालकमंत्र्यांकडून माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न, राजेश क्षीरसागर यांचा आरोप

माजी पालकमंत्र्यांकडून माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न, राजेश क्षीरसागर यांचा आरोप

कोल्हापूर: शहरामध्ये ज्या पध्दतीने काल, बुधवारी दुपारपर्यंत पेठापेठांमधून मला भरघोस पाठबळ मिळाले. त्यामुळे ‘काय करू आणि काय नको’ अशी अवस्था झालेले माजी पालकमंत्र्यांनी आपल्यावर दोन वेळा हल्ल्याचा प्रयत्न केला असा आरोप राज्य नियोजन म्ंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला. सुदैवाने मी वाचलो. परंतू या घटनांचा निषेध करत या प्रकरणी निवडणूक आयोग आणि जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी आमदार जयश्री जाधव,सत्यजित कदम, भाजपचे महेश जाधव, राष्ट्रवादीचे आदिल फरास उपस्थित होते.

ते म्हणाले, शहरात चांगल्या पध्दतीने मतदान सुरू हाेते. टाकाळ्यातील काही जणांनी मला फोन केला की आमच्याकडे विकासकामे झाली नाहीत. आम्ही मतदान करणार नाही. म्हणून त्यांची समजूत घालण्यासाठी मी गेलो. यावेळी २०/२५ गुंड हातात दांडकी घेवून होते. हे नियोजनबद्ध होते. परंतू मी परिस्थिती पाहून शांत राहण्याचा निर्णय घेतला. तर उलट आमच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून हा प्रकार करून आमचीच बदनामी करण्यात आली. माझा अंगरक्षक पोलिसही जखमी झाला आहे. तो देखील तक्रार करणार आहे.

पुढे क्षीरसागर म्हणाले, दुपारी कसबा बावड्यात ठाकरे गट आणि आमचे सुनील जाधव यांच्यात वादावादी झाली. ती मीच पुढे होवून शांत केली. परंतू आम्ही हॉटेलमध्ये मिसळ खात असताना १०० /१५० चा जमाव या ठिकाणी जमला. हे सर्व नियोजनपूर्वक होते. परंतू मसीहा असल्यासारखे ते तिथे आले आणि भाषण करून गेले. हे सर्व षडयंत्र होते. यांची काळी कृत्ये कधी बाहेर येत नाहीत. माझ्या वैयक्तिक बदनामीबाबतही मी कायदेशीर सल्ला घेत आहे. या सर्व प्रकारांविरोधात दाद मागणार आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 An attempt to attack me by the former Guardian Minister Allegation of Rajesh Kshirsagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.