Kagal Vidhan Sabha Election 2024: कागलमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न, समरजित घाटगे यांचा आरोप

By समीर देशपांडे | Published: November 20, 2024 11:15 AM2024-11-20T11:15:13+5:302024-11-20T11:19:50+5:30

कोल्हापूर : कागल शहर आणि पिराचीवाडी येथे बोगस मतदानाचा प्रयत्न आमच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला आहे. यापुढे तरी किमान प्रशासनाने ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Attempted bogus voting in Kagal, Samarjit Ghatge alleges | Kagal Vidhan Sabha Election 2024: कागलमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न, समरजित घाटगे यांचा आरोप

Kagal Vidhan Sabha Election 2024: कागलमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न, समरजित घाटगे यांचा आरोप

कोल्हापूर : कागल शहर आणि पिराचीवाडी येथे बोगस मतदानाचा प्रयत्न आमच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला आहे. यापुढे तरी किमान प्रशासनाने खबरदारी घ्यावी असा मी सक्त इशारा देतो. असंवैधानिक पध्दतीने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न पालकमंत्री करत असून हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे यांनी दिला. 

घाटगे म्हणाले, कागल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील बूथ क्रमांक ३६ आणि ३७ वर बोगस मतदानाचा प्रयत्न झाला. परंतू आमच्या सिकंदर या कार्यकर्त्याने आक्षेप घेतल्यानंतर हे मतदान होवू दिले नाही. पिराचीवाडी येथील असा प्रकारही हाणून पाडण्यात आला आहे. कागल विधानसभा मतदारसंघात हे चालू देणार नाही. प्रशासनाने याबाबत अधिक दक्षता घ्यावी असे आवाहनही घाटगे यांनी केले आहे. याबाबतचा व्हीडीओ घाटगे यांनी समाजमाध्यमावर शेअर केला आहे.

कागल मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे यांच्यात कांटे के टक्कर होत आहे. शरद पवार यांनी या मतदारसंघात लक्ष घातल्याने संपुर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले आहे. 

जिल्ह्यात सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी केंद्रावर रांगा लावल्या आहेत. सकाळी ७ वा.पासून मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.३८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक मतदान कागल विधानसभा मतदारसंघात ८.७८ टक्के झाले आहे.   

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Attempted bogus voting in Kagal, Samarjit Ghatge alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.