भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक यांची २३ कोटींची मालमत्ता, गेल्या पाच वर्षांत कितीने वाढली मालमत्ता.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 12:17 IST2024-10-25T12:16:05+5:302024-10-25T12:17:12+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी आमदार अमल महाडिक यांची २३ कोटी ५७ ...

भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक यांची २३ कोटींची मालमत्ता, गेल्या पाच वर्षांत कितीने वाढली मालमत्ता.. वाचा
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी आमदार अमल महाडिक यांची २३ कोटी ५७ लाख रुपयांची मालमत्ता आहे. गेल्या पाच वर्षांत पाच कोटी रुपयांनी ही मालमत्ता वाढली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी १८ कोटी रुपयांची मालमत्ता प्रतिज्ञापत्रात सादर केली होती.
महाडिक यांची ९ कोटी ४९ लाख रुपयांची जंगम तर १४ कोटी ७ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांच्या नावावर १ कोटी ४४ लाख ६४ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. महाडिक यांच्याकडे ४६७ ग्रॅम सोने असून त्यांच्या पत्नी शौमिका यांच्याकडे २०० ग्रॅम सोने आहे. अमल महाडिक यांनी २००० साली कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजमधून बी.एस्सी.ची डिग्री घेतली आहे. त्यांच्या नावावर ५३ लाख ८५ हजार रुपयांचे चारचाकी वाहन असून ३० हजार रुपयांची दुचाकी आहे.