कोल्हापूर जिल्ह्यात अटीतटीच्या लढती; कुठे बंडखोरी, कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार..वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 06:25 PM2024-11-05T18:25:34+5:302024-11-05T18:27:03+5:30

कोल्हापूर उत्तरला जरी मधुरिमाराजे यांनी माघार घेतली असली तरीही लाटकर यांना काँग्रेसने पाठबळ दिल्यास ही लढतही चुरशीची होणार

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 In the assembly elections Close contests in all ten constituencies of Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात अटीतटीच्या लढती; कुठे बंडखोरी, कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार..वाचा सविस्तर

कोल्हापूर जिल्ह्यात अटीतटीच्या लढती; कुठे बंडखोरी, कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार..वाचा सविस्तर

कोल्हापूर : जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणाऱ्या आणि फेरमांडणी करणाऱ्या या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांतील लढती अटीतटीच्या होणार हे सोमवारी स्पष्ट झाले. चंदगड मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून, राधानगरीमध्येही ए. वाय. पाटील यांना थांबवण्यात महाविकास आघाडीला अपयश आले आहे. एकीकडे जनसुराज्य शक्ती महायुतीमध्ये असताना दोन मतदारसंघांत जनसुराज्यने बंडखोरी केली आहे. कोल्हापूर उत्तरला जरी मधुरिमाराजे यांनी माघार घेतली असली तरीही लाटकर यांना काँग्रेसने पाठबळ दिल्यास ही लढतही चुरशीची होणार आहे.

चंदगड मतदारसंघात भाजपच्या शिवाजीराव पाटील यांनी अपक्ष उभे राहत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. ते फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. तर महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार डॉ. नंदिनी बाभूळकर यांनाही बंडखोरीचा सामना करावा लागला आहे. जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी पुन्हा त्यांना आव्हान दिले आहे. त्यांना थांबवण्यात सतेज पाटील यांना अपयश आले. या ठिकाणी जुनसुराज्यच्या मानसिंग खोराटे यांनी रंगत वाढवली असून, त्याचा फटका नेमका कोणाला बसणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

राधानगरीमध्ये शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आबिकटर विरुद्ध उद्धवसेनेचे के. पी. पाटील यांच्या संघर्षात जिल्हा बँकेचे आजी अध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या बंडखोरीने चुरस निर्माण केली आहे. वास्तविक ते पक्षीय उमेदवारीसाठी काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या संपर्कात होते. परंतु, तिथे मेहुणे के. पी. यांनी बाजी मारली आणि ए. वाय. यांची समजूत काढणे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हाताबाहेर गेले. त्यामुळे लोकसभेला शाहू छत्रपती यांना प्रचंड मताधिक्य देणाऱ्या राधानगरी मतदारसंघात बंडखोरी झाली आहे.

कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे समरजित घाटगे यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे. कोल्हापूर दक्षिणमध्येही दुरंगी लढत असून, काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे माजी आमदार अमल महाडिक हे एकमेकांना भिडणार आहेत.

करवीर मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल यांच्याविरोधात शिंदेसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात प्रमुख लढत असून, या ठिकाणी जनसुराज्यने संताजी घोरपडे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांचा फटका नेमका कोणाला बसणार हे निकालानंतर कळणार आहे.

कोल्हापूर उत्तरमध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात राजेश लाटकर यांची लढत होईल. ते जरी अपक्ष असले तरी त्यांना काँग्रेस पाठबळ देण्याची शक्यता आहे.

शाहूवाडीमध्ये पारंपरिक दुरंगी लढत असून, जनसुराज्य शक्तीचे विद्यमान आमदार विनय काेरे विरुद्ध उद्धवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर रिंगणात आहेत.

हातकणंगलेमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू आवळे, जनसुराज्य शक्तीचे अशोकराव माने आणि माजी आमदार स्वाभिमानीचे डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात सामना रंगेल. या ठिकाणी स्वाभिमानीचे माजी जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी बंडखोरी केली आहे.

इचलकरंजीत भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मदन कारंडे लढत होणार असून, अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे हेदेखील रिंगणात आहेत. परंतु, या ठिकाणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांच्यासह काही मराठा उमेदवारांनी माघार घेत कारंडे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

शिरोळमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे स्वत:च्या शाहू आघाडीतून रिंगणात असून, त्यांना महायुतीचे पाठबळ मिळणार आहे, तर गणपतराव पाटील काँग्रेसकडून व माजी आमदार उल्हास पाटील स्वाभिमानीकडून रिंगणात उतरले आहेत.

चंदगड
१ नंदाताई ऊर्फ नंदिनी कुपेकर-बाभुळकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), तुतारी वाजविणारा माणूस
२ श्रीकांत अर्जुन कांबळे (बहुजन समाज पार्टी), हत्ती
३ राजेश नरसिंगराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), घड्याळ
४ अर्जुन मारोती दुडंगेकर (वंचित बहुजन आघाडी), गॅस सिलिंडर
५ मानसिंग गणपती खोराटे, (जनसुराज्य शक्ती), नारळाची बाग
६ परशराम पांडुरंग कुट्रे, (संभाजी ब्रिगेड पार्टी), शिवणयंत्र
७ अप्पी ऊर्फ विनायक वीरगोंडा पाटील, (अपक्ष), बादली
८ अशोक शंकर आर्दाळकर, (अपक्ष), ट्रम्पेट
९ अक्षय एकनाथ डवरी, (अपक्ष), शिट्टी
१० जावेद गुलाब अंकली, (अपक्ष), हिरा
११ तुलसीदास लक्ष्मण जोशी, (अपक्ष), बासरी
१२ समीर महंमदइसाक नदाफ, (अपक्ष), हिरवी मिरची
१३ प्रकाश रामचंद्र रेडेकर, (अपक्ष), ऊस शेतकरी
१४ मोहन प्रकाश पाटील, (अपक्ष), स्टूल
१५ रमेश सटुपा कुट्रे, (अपक्ष), टेबल
१६ शिवाजी सटुपा पाटील (अपक्ष), पाण्याची टाकी
१७ संतोष आनंदा चौगुले, (अपक्ष), कपाट

राधानगरी
१ प्रकाश आनंदराव आबिटकर (शिवसेना), धनुष्यबाण
२ कृष्णराव परशराम ऊर्फ के. पी. पाटील (उद्धवसेना), मशाल
३ पांडुरंग गणपती कांबळे (बहुजन समाज पार्टी), हत्ती
४ युवराज रामचंद्र यडुरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), रेल्वे इंजिन
५ आनंदराव यशवंत ऊर्फ ए. वाय. पाटील (अपक्ष), ट्रम्पेट
६ कुदरतुल्ला आदम लतीफ (अपक्ष), टेबल
७ के. पी. पाटील (अपक्ष), चिमणी

कागल
१ अशोक बापू शिवशरण (बहुजन समाज पार्टी), हत्ती
२ समरजित विक्रमसिंह घाटगे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), तुतारी वाजविणारा माणूस
३ हसन मियालाल मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), घड्याळ
४ रोहन अनिल निर्मळ, (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), रेल्वे इंजिन
५ धनाजी रामचंद्र सेनापतीकर (वंचित बहुजन आघाडी), गॅस सिलिंडर
६ ॲड. कृष्णाबाई दीपक चौगुले (अपक्ष), ब्रीफकेस
७ पंढरी दत्तात्रय पाटील (अपक्ष), रोड रोलर
८ प्रकाश तुकाराम बेलवाडे (अपक्ष), शिट्टी
९ राजू बाबू कांबळे (अपक्ष), हिरा
१० विनायक अशोक चिखले (अपक्ष), ऑटोरिक्षा
११ सातापराव शिवाजीराव सोनाळकर (अपक्ष), ट्रम्पेट

कोल्हापूर दक्षिण
१ अमल महादेवराव महाडिक (भारतीय जनता पार्टी) कमळ
२ ऋतुराज संजय पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) हात
३ सुरेश सायबू आठवले (बहुजन समाज पार्टी) हत्ती
४ अरुण रामचंद्र सोनवणे (स्वाभिमानी पक्ष) क्रेन
५ विशाल केरू सरगर (राष्ट्रीय समाज पक्ष) शिट्टी
६ विश्वास रामचंद्र तराटे (रिपब्लिकन पाटील ऑफ इंडिया (ए)) शिवण यंत्र
७ गिरीश बाळासाहेब पाटील (अपक्ष) बुद्धिबळ पट
८ माधुरी भिकाजी कांबळे (अपक्ष) गॅस शेगडी
९ ॲड. यश सुहास हेगडे पाटील (अपक्ष) कोट
१० वसंत जिवबा पाटील (अपक्ष) नारळाची बाग
११ सागर राजेंद्र कुंभार (अपक्ष) हिरा

करवीर
१ विष्णू पांडुरंग गायकवाड (बहुजन समाज पाटील) हत्ती
२ चंद्रदीप शशिकांत नरके (शिवसेना) धनुष्य बाण
३ राहुल पी. एन. पाटील (सडोलीकर) (इंडियन नॅशनल काँग्रेस) हात
४ हरी दत्तात्रय कांबळे (रिपब्लिकन पाटील ऑफ इंडिया (ए) शिवण यंत्र
५ दयानंद मारुती कांबळे (वंचित बहुजन आघाडी) गॅस सिलिंडर
६ बाबा ऊर्फ संताजी फत्तेसिंगराव घोरपडे (जनसुराज्य शक्ती) नारळाची बाग
७ अरविंद भिवा माने (अपक्ष) कॅरम बोर्ड
८ असीफ शबाब मुजावर (अपक्ष) अंगठी
९ ॲड. कृष्णाबाई दीपक चौगले (अपक्ष) हिरा
१० माधुरी राजू जाधव (अपक्ष) प्रेशर कुकर
११ ॲड. माणिक शिंदे (अपक्ष) शिट्टी

कोल्हापूर उत्तर
१ अभिजित दौलत राऊत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) रेल्वे इंजिन
२ राजेश विनायक क्षीरसागर (शिवसेना) धनुष्यबाण
३ श्याम भीमराव पाखरे (बहुजन समाज पार्टी) हत्ती
४ संजय भिकाजी मागाडे (लोकराज्य जनता पार्टी) नागरिक
५ चंद्रशेखर श्रीराम मस्के (अपक्ष) ऑटोरिक्षा
६ दिलीप जमाल मोहिते (अपक्ष) हिरा
७ राजेश भरत लाटकर (अपक्ष) प्रेशर कुकर
८ विनय विलास शेळके (अपक्ष) त्रिकोण
९ शर्मिला शैलेश खरात (अपक्ष) ट्रम्पेट
१० डॉ. गिरीश रामकृष्ण पुणतांबेकर (अपक्ष) गॅस सिलिंडर
११ सदाशिव गोपाळ कोकितकर (अपक्ष) दूरध्वनी

शाहूवाडी
१ डॉ. भारत कासम देवळेकर सरकार (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) रेल्वे इंजिन
२ शामला उत्तमकुमार सरदेसाई (बहुजन समाज पार्टी) हत्ती
३ सत्यजित बाबासाहेब पाटील (आबा) सरुडकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशाल
४ अभिषेक सुरेश पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष) शिट्टी
५ आनंदराव वसंतराव सरनाईक (फौजी बापू) (संभाजी ब्रिगेड पार्टी) शिवणयंत्र
६ संतोष केरबा खोत (कामगार किसान पार्टी) अंगठी
७ डॉ. विनय विलासराव कोरे (सावकर) (जनसुराज्य शक्ती) नारळाची बाग
८ ॲड. दिनकर गणपती घोडे (अपक्ष) नागरिक
९ धनाजी जगन्नाथ गुरव (शिवारेकर) (अपक्ष) ऑटोरिक्षा
१० विनय वि. कोरगावकर (सावकर) (अपक्ष) भेंडी
११ विनय वि. चव्हाण (सावकर) (अपक्ष) झोपाळा
१२ सत्यजित बाळासाहेब पाटील (आबा) (अपक्ष) चिमणी
१३ सत्यजित विलासराव पाटील (अपक्ष) गळ्याची टाय
१४ संभाजी सीताराम कांबळे (अपक्ष) बॅट

हातकणंगले
१ अमर राजाराम शिंदे (बहुजन समाज पार्टी) हत्ती
२ राजू (बाबा) जयवंतराव आवळे (इंडियन नॅशनल काँग्रेस) हात
३ दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) (जनसुराज्य शक्ती) नारळाची बाग
४ डॉ. क्रांती दिलीप सावंत (वंचित बहुजन आघाडी) गॅस सिलिंडर
५ डॉ. गणेश विलासराव वाईकर (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) ट्रम्पेट
६ डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर (स्वाभिमानी पक्ष) शिट्टी
७ अजित कुमार देवमोरे (अपक्ष) ऑटोरिक्षा
८ अशोक तुकाराम माने (अपक्ष) झोपाळा
९ शिवाजी महादेव आवळे (अपक्ष) बॅट
१० कराडे धनाजी लहू (अपक्ष) कपाट
११ वैभव शंकर कांबळे (अपक्ष) प्रेशर कुकर
१२ तुकाराम सबाजी कांबळे (अपक्ष) जातं
१३ देवेंद्र नाना मोहिते (अपक्ष) ट्रक
१४ प्रगती रवींद्र चव्हाण (अपक्ष) ऊस शेतकरी
१५ प्रदीप भीमसेन कांबळे (अपक्ष) फलंदाज
१६ सतीश संभाजी कुरणे (अपक्ष) लिफाफा

इचलकरंजी
१ अमर राजाराम शिंदे, (बहुजन समाज पाटी) हत्ती
२ मदन सीताराम कारंडे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) तुतारी वाजवणारा माणूस
३ रवी गजानन गोंदकर, (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) रेल्वे इंजिन
४ राहुल प्रकाश आवाडे (भारतीय जनता पार्टी) कमळ
५ डॉ. प्रशांत गंगावणे सर, (देश जनहित पार्टी) शाळेचे दप्तर
६ सचिन किरण बेलेकर (राष्ट्रीय समाज पक्ष) हिरा
७ शमशुद्दीन हिदायतुल्ला मोमीन, (वंचित बहुजन आघाडी) गॅस सिलिंडर
८ अभिषेक आदगोंडा पाटील (अपक्ष) बॅट
९ मदन येताळा कारंडे (अपक्ष) अंगठी
१० विठ्ठल पुंडलीक चोपडे (अपक्ष) शिट्टी
११ रावसो गणपती निर्मळे (अपक्ष) लिफाफा
१२ शाहुगोंड सातगोंड पाटील (अपक्ष) प्रेशर कुकर
१३ सॅम ऊर्फ सचिन शिवाजी आठवले (अपक्ष) ट्रम्पेट

शिरोळ
१ गणपतराव आप्पासाहेब पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस) हात
२ दादासो तुकाराम मोहिते (बहुजन समाज पार्टी) हत्ती
३ उल्हास संभाजी पाटील (स्वाभिमानी पक्ष) स्नॅपर
४ विश्वजित पांडुरंग कांबळे (रिपब्लिकन सेना) लिफाफा
५ राजेंद्र श्यामगोंडा पाटील (यड्रावकर) (राजर्षी शाहू विकास आघाडी) शिट्टी
६ गजाला मुबीन मुल्ला (आष्टेकर) (अपक्ष) शिवणयंत्र
७ जितेंद्र रामचंद्र ठोंबरे (अपक्ष) प्रेशर कुकर
८ राहुल रामकृष्ण कांबळे (अपक्ष) पेट्रोलपंप
९ शीला श्रीकांत हेगडे (अपक्ष) गॅस सिलिंडर
१० शंकर रामगोंडा बिराजदार (अपक्ष) बॅट

सर्वाधिक उमेदवार चंदगडमध्ये

महाविकास आणि महायुती अशा दोन्हीकडेही बंडखोरी केवळ चंदगड तालुक्यातच झाली आहे. दहापैकी सर्वाधिक उमेदवार हे चंदगड मतदारसंघात १७ असून, सर्वात कमी उमेदवार राधानगरी मतदारसंघात ७ आहेत.

चार मतदारसंघांत ११ उमेदवार

माघारीनंतर चार मतदारसंघांत प्रत्येकी ११ उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये कागल, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर मतदारसंघांचा समावेश आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 In the assembly elections Close contests in all ten constituencies of Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.