Vidhan Sabha Election 2024: चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांचा 'भाजप'ला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 03:13 PM2024-11-25T15:13:10+5:302024-11-25T15:14:30+5:30

राम मगदूम  गडहिंग्लज: चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला. मंत्रालयात उपमुख्यमंत्री ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Independent MLA Shivajirao Patil of Chandgarh supports BJP | Vidhan Sabha Election 2024: चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांचा 'भाजप'ला पाठिंबा

Vidhan Sabha Election 2024: चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांचा 'भाजप'ला पाठिंबा

राम मगदूम 

गडहिंग्लज: चंदगड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला. मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, 'कोल्हापूर दक्षिण'चे आमदार अमल महाडिक उपस्थित होते.

'महायुती'तील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट)विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा त्यांनी तब्बल २४ हजाराच्या मताधिक्याने पराभव केला आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्हयातील महायुतीच्या आमदारांसोबतच ते खास विमानाने मुंबईला जाऊन त्यांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. विजयाबद्दल आमदार पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पाठिंब्याबदल आभार मानले.

गेल्यावेळीही त्यांनी 'भाजप-सेनायुती'तील शिवसेनेचे उमेदवार संग्रामसिंह कुपेकर यांच्याविरूद्ध बंडखोरी केली होती. परंतु, त्यांचा आमदार राजेश पाटील यांच्याकडून थोडक्यात पराभव झाला होता. मात्र, पराभवानंतरही  जनसंपर्काबरोबरच पक्ष बांधणीच्या कामात व्यस्त राहिले. म्हणूनच, पक्षाने त्यांच्यावर चंदगड मतदार संघाच्या निवडणूक प्रचार प्रमुखपदाची धुरा सोपवली होती. तथापि,यावेळी 'चंदगड'ची जागा  राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेली.त्यामुळे त्यांनी 'महायुती'चे विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्याविरूध्द बंड केले.पंचरंगी निवडणूकीत त्यांनी आमदार राजेश पाटील यांचा तब्बल २४ हजार मतांनी पराभव केला.

'चंदगड'मध्ये 'शिवा'भाऊ !

'अपक्ष उमेदवार' म्हणून निवडणूक लढवताना देखील शिवाजीराव पाटील यांनी उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावूनच प्रचार केला." महाराष्ट्रात 'देवा'भाऊ, 'चंदगड'मध्ये शिवाभाऊ"अशीच त्यांची 'टॅगलाईन' होती. निवडणूकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी 'भाजप'ला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Independent MLA Shivajirao Patil of Chandgarh supports BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.