खलनायकी प्रवृत्तीला हद्दपार करू या, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 01:09 PM2024-11-06T13:09:24+5:302024-11-06T13:12:48+5:30

सेनापती कापशी : आजपर्यंत जनतेने मला संधी दिली, म्हणून माझ्या हातून ७५० देवालयांचा जिर्णोद्धार करण्याचे भाग्य मिळाले. कामगार खात्याच्या ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Let's banish the villainous tendencies Guardian Minister Hasan Mushrif appeal | खलनायकी प्रवृत्तीला हद्दपार करू या, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन 

खलनायकी प्रवृत्तीला हद्दपार करू या, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन 

सेनापती कापशी : आजपर्यंत जनतेने मला संधी दिली, म्हणून माझ्या हातून ७५० देवालयांचा जिर्णोद्धार करण्याचे भाग्य मिळाले. कामगार खात्याच्या माध्यमातून मतदारसंघात बांधकाम कामगारांच्या मुलांना ४८ कोटी रुपये शिष्यवृत्ती मिळाली. अशा विकासकामाच्या जोरावर गोरगरिबांची सेवा करण्याची संधी मिळाली. परंतु, मला तुरुंगात टाकून आणि कुटुंबीयांना छळून स्वतः आमदार होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या खलनायकी प्रवृत्तीला हद्दपार करू या, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

चिकोत्रा (ता. कागल) येथील आलाबादसह, अर्जुनवाडा, नंद्याळ, तमनाकवाडा येथील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, चिकोत्रा, नागणवाडी, आंबेओहळ प्रकल्पांचा पाठपुरावा केल्याने वंचित गावांना कायमस्वरूपी पाण्याची सोय झाली. चिकोत्रा खोऱ्यात हिरवाई आणल्याचे मला समाधान वाटत आहे. येथून पुढेही जनतेची सेवा करण्याची मला संधी द्यावी.

अंबरीष घाटगे म्हणाले, संजय घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांच्याशी संघर्ष केला. पण, त्यामध्ये व्यक्तिगत कटुता अजिबात नव्हती. मात्र, समरजीत घाटगे यांनी ईडीचा ससेमिरा लावला. घरातील महिलांना त्रास देऊन आमदार होण्याच्या या राक्षसी महत्त्वाकांक्षी प्रवृत्तीला रोखले पाहिजे.

मधुकर करडे म्हणाले, समरजीत घाटगे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहेत. शेतकऱ्यांची अडचण कधीच समजून घेतली नाही. ऊस तोडीत फार मोठा दुजाभाव केला जातो. गावातल्या माणसाला घेऊन गेल्याशिवाय काम होत नाही.

आलाबाद येथे जोती मुसळे, सरपंच लताताई कांबळे, संतोष खराडे, एकनाथ कामते, तौफिक देसाई, ईश्वरा चौगले, सिद्धाप्पा गोरे, आनंदा सरवडे, तानाजी कामते तर तमनाकवाडा येथे सरपंच रंजना चौगले, उपसरपंच आक्काताई तिप्पे, डी. आर. चौगले, शिवाजी तिप्पे, दत्तात्रय चौगले, सौरभ तिप्पे, संजय चौगले, दयानंद साळवी उपस्थित होते.

दातृत्व असावे, तर मुश्रीफ यांच्यासारखे

अर्जुनवाडाचे माजी सरपंच प्रदीप पाटील म्हणाले, अर्जुनवाडा गावातील मुले राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना खेळाचे साहित्य व प्रवास खर्चासाठी मंत्री मुश्रीफ यांनी ४५ हजार रुपये दिले. त्यांच्यासारखे दातृत्व दुसरे कोणाचे नाही.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Let's banish the villainous tendencies Guardian Minister Hasan Mushrif appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.