कोल्हापुरात महायुती, महाआघाडीच्या दिग्गज नेत्यांनी गाजवल्या सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:20 PM2024-11-19T12:20:54+5:302024-11-19T12:22:53+5:30
महायुतीकडून चार मुख्यमंत्री, चार केंद्रीय मंत्री प्रचारात
कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा चांगल्याच गाजवल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार, कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सुषमा अंधारे यांच्या तोफा धडाडल्या.
दहा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक पाच जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार होते. तीन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तर दोन जागांवर उद्धवसेना लढत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रचार सभांची सर्वच ठिकाणी मागणी होती. पण, राज्यात इतर ठिकाणीही प्रचार सभांना उपस्थित लावायची असल्याने काही स्टार प्रचारक कोल्हापुरात आले नाहीत.
ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, कॉंग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा अल्का लंबा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह तिन्ही पक्षाचे माजी आमदार, मंत्र्यांनी सभा गाजवल्या.
महायुतीकडून चार मुख्यमंत्री, चार केंद्रीय मंत्री प्रचारात
कोल्हापूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीने अनेक मान्यवर नेत्यांच्या झंझावती दौऱ्याचे नियोजन केल्याचे महावयास मिळाले. गेल्या पंधरा दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने चार मुख्यमंत्री, चार केंद्रीय मंत्री प्रचारात उतरवले. पक्षाचे पदाधिकारीही त्यांच्या जोडीला कार्यरत होते.
महायुतीकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात जास्त सभा कोल्हापूर जिल्ह्यात घेतल्या. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनाही भाजपने महायुतीच्या प्रचारासाठी आणले. कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर मतदारसंघांचा विचार करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभेचे खास आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी