यड्रावकर यांना भाजपच्या झेंड्याचे एवढे वावडे का..? रामचंद्र डांगे यांची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 01:10 PM2024-11-01T13:10:54+5:302024-11-01T13:13:19+5:30

कुरुंदवाड : आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MLA Rajendra Patil Ydravkar avoided using BJP flags and banners says Ramchandra Dange | यड्रावकर यांना भाजपच्या झेंड्याचे एवढे वावडे का..? रामचंद्र डांगे यांची विचारणा

यड्रावकर यांना भाजपच्या झेंड्याचे एवढे वावडे का..? रामचंद्र डांगे यांची विचारणा

कुरुंदवाड : आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचे छायाचित्र वापरला नाही. भाजपचे झेंडे, बॅनर याचा वापर जाणीवपूर्वक टाळला आहे. त्यांना भाजपच्या झेंड्याचे एवढे वावगे का वाटत आहे.. त्यांना आता भाजपची गरज नाही, त्यामुळे भाजपकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवली जाईल, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते व कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ डांगे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

डांगे म्हणाले, जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, तालुका मंडल अध्यक्ष मिलिंद भिडे, शिरोळ मंडल अध्यक्ष संभाजी भोसले, अन्वर जमादार यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय भोजे व तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत धैर्यशील माने यांच्या प्रचारावेळी भाजपाचे झेंडे, नेत्याचे फोटो व कार्यकर्ते सोबत घ्यायला शिंदे गटाला अडचण नव्हती. मग विधानसभेलाच अडचण का निर्माण झाली आहे. 

यड्रावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरताना शिंदे गटाला मिळालेल्या जागेवर भरला हे त्यांनी विसरू नये. अर्ज दाखल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील या प्रमुख नेत्याचे छायाचित्र वापरले नाही शिवाय भाजपचे झेंड्याचा वापर जाणीवपूर्वक टाळला. त्यांना महायुतीतून उमेदवारी मिळाली असताना केवळ स्वतःचा गट मजबूत करण्यासाठी त्यांनी भाजपला फाट्यावर मारले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत मोठी नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीत भोजे किंवा गावडे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचेही डांगे यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MLA Rajendra Patil Ydravkar avoided using BJP flags and banners says Ramchandra Dange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.