छाननीत कोल्हापूर जिल्ह्यातील १९ उमेदवारांचे ३८ अर्ज अवैध, कुणाचे अर्ज झाले बाद.. वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 12:19 PM2024-10-31T12:19:08+5:302024-10-31T12:19:56+5:30
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अर्जावर घेण्यात आलेला आक्षेप
कोल्हापूर : कागलमधील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अर्जाबद्दल घेतलेली हरकत वगळता जिल्ह्यात उमेदवारी अर्जाची छाननीची प्रक्रिया शांततेत पार पडली. विधानसभेच्या दहाही मतदारसंघातील १९ जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत. एकूण २२१ उमेदवारांनी ३२४ अर्ज दाखल करण्यात आले होते. याची छाननी प्रक्रिया बुधवारी पार पडली. १९ जणांचे अर्ज छाननीत बाद झाल्याने आता १० जागांसाठी २०२ उमेदवारांचे २८६ अर्ज वैध ठरले आहेत.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अर्जावर घेण्यात आलेला आक्षेप फेटाळण्यात आला आहे. अपूर्ण कागदपत्रे आणि नमुना ‘ए’, ‘बी’ सादर न केल्याने हे अर्ज बाद ठरविण्यात आले आहे. या दहाही मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी वडील, पत्नी, भाऊ यांच्या नावे डमी अर्ज दाखल केले होते. ज्यांचे अर्ज पक्षाच्या नावे होते त्यांना एबी फॉर्म नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले, तर त्यांचे अपक्ष अर्ज मात्र मंजूर करण्यात आले.
विधानसभा मतदारसंघ - अवैध अर्ज - उमेदवार / वैध अर्ज
- चंदगड - ०७ - २६/३८
- राधानगरी - ०१ - १४/२७
- कागल - ०७ - २१/२६
- कोल्हापूर दक्षिण - ०३ - २४/३०
- करवीर - ०४ - १३/१८
- कोल्हापूर उत्तर - ०२ - २३/३१
- शाहूवाडी - ०० - १५/२७
- हातकणंगले - ०३ - २५/३२
- इचलकरंजी - ०६ - १८/२७
- शिरोळ - ०५ - २३/३०