कोल्हापूर जिल्ह्यात कोट्यधीश निवडणूक रिंगणात; समरजित घाटगे सर्वाधिक श्रीमंत, कमी संपत्ती कोणाची.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 12:07 PM2024-10-31T12:07:27+5:302024-10-31T12:08:38+5:30

कोल्हापूर : समोरच्या उमेदवाराची झोळी फाटकी असली तरी कैक उमेदवारांना जनतेने गुलाल लावल्याची उदाहरणे या राज्यात आहेत. मात्र, अलीकडच्या ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Samarjit Ghatge is the richest candidate from Kagal constituency in Kolhapur district in the assembly election | कोल्हापूर जिल्ह्यात कोट्यधीश निवडणूक रिंगणात; समरजित घाटगे सर्वाधिक श्रीमंत, कमी संपत्ती कोणाची.. वाचा

कोल्हापूर जिल्ह्यात कोट्यधीश निवडणूक रिंगणात; समरजित घाटगे सर्वाधिक श्रीमंत, कमी संपत्ती कोणाची.. वाचा

कोल्हापूर : समोरच्या उमेदवाराची झोळी फाटकी असली तरी कैक उमेदवारांना जनतेने गुलाल लावल्याची उदाहरणे या राज्यात आहेत. मात्र, अलीकडच्या काळात निवडणुका हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या यादीकडे नजर टाकली तर झाडून सगळे उमेदवार कोट्यधीश असल्याचे दिसते. कागलमधून निवडणूक लढवणारे समरजित घाटगे हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत.

मतदारसंघ : कागल
हसन मुश्रीफ 
स्थावर मालमत्ता : १० कोटी
जंगम मालमत्ता : ५ कोटी
कर्ज : ८ लाख ७४ हजार

समरजित घाटगे 
स्थावर व जंगम मिळून १४९ कोटी रुपये
कर्ज : १४ लाख ५८ हजार रुपये

मतदारसंघ : कोल्हापूर दक्षिण
ऋतुराज पाटील

स्थावर मालमत्ता : २३ कोटी ३० लाख
जंगम मालमत्ता : २५ कोटी १८ लाख
कर्ज : २६ कोटी ९८ लाख

अमल महाडिक 
स्थावर मालमत्ता : ११ कोटी ६९ लाख
जंगम मालमत्ता : ८ कोटी ९३ लाख
कर्ज : ५ कोटी ५८ लाख

मतदारसंघ : कोल्हापूर उत्तर
राजेश क्षीरसागर

स्थावर मालमत्ता : ६ कोटी ५५ लाख
जंगम मालमत्ता : ४ कोटी ४३ लाख
कर्ज : ५६ लाख ७२ हजार

मधुरिमाराजे छत्रपती
स्थावर व जंगम मालमत्ता : १ कोटी ९० लाख रुपये
कर्ज : नाही

मतदारसंघ : करवीर
चंद्रदीप नरके

स्थावर व जंगम मालमत्ता : १३ कोटी ७९ लाख
कर्ज : २ कोटी २२ लाख रुपये

राहुल पाटील
स्थावर मालमत्ता :१ कोटी ७३ लाख
जंगम मालमत्ता : २ कोटी २१ लाख
कर्ज : नाही

मतदारसंघ : इचलकरंजी
राहुल आवाडे

स्थावर मालमत्ता : ९७ लाख रुपये
जंगम मालमत्ता : १८ कोटी ५ लाख रुपये
कर्ज : १५ कोटी ११ लाख रुपये

मतदारसंघ : शाहूवाडी
विनय कोरे

स्थावर मालमत्ता : १ कोटी ७१ लाख
जंगम मालमत्ता : २ कोटी ६९ लाख
कर्ज : २६ कोटी ९८ लाख

सत्यजित पाटील-सरूडकर
स्थावर मालमत्ता : २ कोटी ७७ लाख
जंगम मालमत्ता : २८ लाख ९२ हजार
कर्ज : २ लाख ७९ हजार

मतदारसंघ : राधानगरी
प्रकाश आबिटकर

स्थावर मालमत्ता : ३३ लाख २४ हजार २७७
जंगम मालमत्ता : ८९ लाख २७ हजार ६५७
कर्ज : १८ लाख ५६ हजार ९९४

के.पी. पाटील
स्थावर मालमत्ता : ३ कोटी ६८ लाख
जंगम मालमत्ता : १५ लाख २१ हजार
कर्ज : ३ लाख ८७ हजार

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Samarjit Ghatge is the richest candidate from Kagal constituency in Kolhapur district in the assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.