समरजीत घाटगे यांच्याकडे वडिलोपार्जित शेत जमीन संपत्ती सर्वाधिक, एकूण मालमत्ता किती.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 03:18 PM2024-10-30T15:18:08+5:302024-10-30T15:20:22+5:30

कागल : कागल , गडहिंग्लज, उत्तुर, विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे यांनी त्यांच्याकडे एकशे ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Samarjit Ghatge the candidate of Sharad Pawar faction of NCP in Kagal, Gadhinglaj, Uttur, assembly constituencies has assets of 160 crores | समरजीत घाटगे यांच्याकडे वडिलोपार्जित शेत जमीन संपत्ती सर्वाधिक, एकूण मालमत्ता किती.. जाणून घ्या

समरजीत घाटगे यांच्याकडे वडिलोपार्जित शेत जमीन संपत्ती सर्वाधिक, एकूण मालमत्ता किती.. जाणून घ्या

कागल: कागल, गडहिंग्लज, उत्तुर, विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे यांनी त्यांच्याकडे एकशे ५९ कोटी ८९ लाख ९ हजार रुपयांची संपत्ती असल्याचे निवडणूक आयोगास सादर केलेल्या संपत्ती विवरणपत्रात म्हटले आहे. तर, पत्नी नवोदिता घाटगे यांच्याकडे ९ कोटी ६ लाख ४१ हजार रुपयांची संपत्ती आहे. समरजित घाटगे यांच्यावर १४ लाख ५८ हजार रुपये, तर त्यांच्या पत्नीवर ३२ लाख १८ हजार रुपयांचे कर्ज आहे.

रोख रक्कम, ठेवी, शेअर्स, दागिने, शेतजमीन, शेतजमीन, इमारती इत्यादी मालमत्ता आहेत. समरजित यांच्याकडे एक लाख ५८ हजार रुपये रोख आणि ४ कोटी ०१ लाख ४८ हजार रुपयांच्या ठेवी आहेत. विविध कंपन्यांचे ६१ लाख रुपयांचे शेअर्स आणि ३५ लाख ४९ हजार रुपयांची वाहने त्यांच्या नावावर आहेत. ८२ लाख ६७ हजार रुपयांचे दागिने, तर पत्नीकडे ५६ लाख ७८ हजार रुपयांच्या ठेवी आणि ४२ लाख ७४ हजार रुपयांचे दागिने आहेत. समरजित घाटगे यांच्या वडिलोपार्जित जमिनीची किंमत ११५ कोटी ७४ लाख आणि पत्नीकडे ६ कोटी १७ लाख ९० हजार रुपयांचे कृषी क्षेत्र आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Samarjit Ghatge the candidate of Sharad Pawar faction of NCP in Kagal, Gadhinglaj, Uttur, assembly constituencies has assets of 160 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.