Vidhan Sabha Election 2024: मुश्रीफांच्या डबल हॅट्ट्रिकला समरजित यांचे आव्हान, कागलमध्ये दुरंगीमुळे काटाजोड लढत

By विश्वास पाटील | Published: November 11, 2024 06:06 PM2024-11-11T18:06:41+5:302024-11-11T18:09:19+5:30

जनता कुणाच्या पाठीशी यावरच निकाल

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Samarjit Ghatge's challenge to Minister Hasan Mushrif double hat trick | Vidhan Sabha Election 2024: मुश्रीफांच्या डबल हॅट्ट्रिकला समरजित यांचे आव्हान, कागलमध्ये दुरंगीमुळे काटाजोड लढत

Vidhan Sabha Election 2024: मुश्रीफांच्या डबल हॅट्ट्रिकला समरजित यांचे आव्हान, कागलमध्ये दुरंगीमुळे काटाजोड लढत

विश्वास पाटील

कोल्हापूर : गेली तीस वर्षे कागलच्या राजकारणावर मांड ठेवून असलेले मातब्बर नेते, वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू सहकार समूहाचे नेते समरजित घाटगे यांच्यात कागल विधानसभा मतदारसंघात अत्यंत अटीतटीची लढत होत आहे. मुश्रीफ राष्ट्रवादीकडून, तर घाटगे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रिंगणात आहेत. कागलमधील तीन प्रबळ गट व बहुतांशी नेते मुश्रीफ यांच्या पाठीशी आहेत. आता जनता कुणाच्या पाठीशी राहते यावरच मुश्रीफ यांच्या डबल हॅट्ट्रिकचा निर्णय लागेल.

मुश्रीफ सलग पाचवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. या मतदारसंघात जेव्हा एकास एक लढत होते तेव्हा ती अधिक चुरशीची होते. गेल्या निवडणुकीत मुश्रीफ यांना संजय घाटगे यांच्या उमेदवारीचा फायदा झाला. तिरंगी लढतीत ते सहज निवडून आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला ताकदीचा उमेदवारच मिळू नये यासाठी संजय घाटगे यांना त्यांनी अगोदरच सोबत घेतले.

समरजित घाटगे हे भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोडणार नाहीत, असा त्यांचा अंदाज होता; परंतु त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची उमेदवारी घेतली. स्वत: पवार यांनीच आता मुश्रीफ यांना आव्हान दिल्याने राज्याचे लक्ष या लढतीकडे आहे. मुश्रीफ हा कसलेला पैलवान आहे तो हे आव्हान कसे पेलतो यावरच निकाल अवलंबून असेल.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे..

  • विकासकामे झाली तरी त्यातून मतदारसंघाचा नव्हे तर ठरावीक ठेकेदारांंचेच भले झाल्याचा आरोप
  • शाश्वत विकास, बेरोजगारीचा प्रश्न, गडहिंग्लज एमआयडीसीत नव्या उद्योगांची वानवा.


लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काय झाले हाच विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील कळीचा मुद्दा ठरला आहे. लोकसभेला महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी पालकमंत्री मुश्रीफ. आताचे विरोधी उमेदवार व तत्कालीन भाजप नेते समरजित घाटगे हे होते. म्हणजे तालुक्यातील तीन प्रबळ गट मंडलिक यांच्या पाठीशी होते. मुश्रीफ यांनी या निवडणुकीत त्यांना एक लाखाचे मताधिक्य देण्याची घोषणा केली होती; परंतु प्रत्यक्षात मंडलिक यांना १४ हजार ४२६ मताधिक्य मिळाले. त्यास कोण कोण कारणीभूत होते याचा हिशोब आता मंडलिक गट मागू लागला आहे.

  • एकूण मतदार : ३,३९,८४४
  • पुरुष : १,६९,८१८
  • महिला : १,७०,०२१
  • एकूण केंद्रे : ३५८
     

२०१९ मध्ये काय घडले?

  • हसन मुश्रीफ राष्ट्रवादी (विजयी) : १,१६,४३६
  • समरजित घाटगे अपक्ष ८८,३०३.
  • संजय घाटगे शिवसेना : ५५,६५७
  • नोटा : ११६३.


२०१९च्या पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी..?
वर्ष - विजयी उमेदवार - पक्ष - मते - टक्के

२०१४ - हसन मुश्रीफ - राष्ट्रवादी -१,२३,६२६ - ९.१६)
२००९ - हसन मुश्रीफ - राष्ट्रवादी - १,०४,२४१ - (४६.३३)
२००४ - हसन मुश्रीफ - राष्ट्रवादी - ७९,५३३ - (४९.०४)
१९९९ - हसन मुश्रीफ - राष्ट्रवादी - ६७,६१० - (५०.०९)
१९९८ - पोटनिवडणूक - संजय घाटगे - शिवसेना - ६७,४७२ - (५२.४३)

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Samarjit Ghatge's challenge to Minister Hasan Mushrif double hat trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.