‘कोल्हापूर शहर स्वतंत्र प्रशासकीय घटक’ मान्यता मिळण्यासाठी ‘महाराष्ट्र चेंबर’ पुढाकार घेईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:31+5:302021-06-29T04:17:31+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासमवेत झालेल्या चर्चेची माहिती राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना ललित गांधी यांनी दिली. कोल्हापूर ...

The Maharashtra Chamber will take the initiative to get Kolhapur city recognized as an independent administrative unit | ‘कोल्हापूर शहर स्वतंत्र प्रशासकीय घटक’ मान्यता मिळण्यासाठी ‘महाराष्ट्र चेंबर’ पुढाकार घेईल

‘कोल्हापूर शहर स्वतंत्र प्रशासकीय घटक’ मान्यता मिळण्यासाठी ‘महाराष्ट्र चेंबर’ पुढाकार घेईल

Next

जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासमवेत झालेल्या चर्चेची माहिती राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना ललित गांधी यांनी दिली. कोल्हापूर शहर स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता मिळविण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर दोन दिवसांत मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रशासनाच्या विनंतीचा मान म्हणून व्यापाऱ्यांनी आपल्या आंदोलनाची भूमिका मागे घेतली आहे. हा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेऊन त्यानुसार आपले व्यापार सुरू करू, असे ललित गांधी यांनी सांगितले. व्यापाऱ्यांची अडचण, सर्व समस्या योग्य असल्याचे प्रशासनानेही मान्य केले आहे. त्याबद्दल प्रशासनाचे आभार मानतो. सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावरच्या शिखर संस्थांच्या मध्यस्थीने हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: The Maharashtra Chamber will take the initiative to get Kolhapur city recognized as an independent administrative unit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.