शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल, कमला कॉलेजची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 06:18 PM2018-10-06T18:18:23+5:302018-10-06T18:21:32+5:30
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्षांखालील म.न.पा.स्तर शालेय स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्र हायस्कूलने न्यू कॉलेजचा, तर मुलींमध्ये कमला कॉलेजने छत्रपती शाहू विद्यालयाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्षांखालील म.न.पा.स्तर शालेय स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्र हायस्कूलने न्यू कॉलेजचा, तर मुलींमध्ये कमला कॉलेजने छत्रपती शाहू विद्यालयाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
संभाजीनगर येथील क्रीडासंकुलात शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने न्यू कॉलेजचा ३-० असा पराभव केला. ‘महाराष्ट्र’कडून कुणाल चव्हाण, सार्थक राऊत, प्रणव घाटगे यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद करीत विजय सुकर केला.
विजयी संघात मयूरेश चौगले, ऋतुराज सूर्यवंशी, सिद्धेश देसाई, प्रथमेश पाटील, विनायक चौगुले, कुणाल चव्हाण, आर्यवीर सरनोबत, प्रणव घाटगे, प्रणव कणसे, ओंकार बेळगुतकर, दिग्विजय आसणेकर, सार्थक राऊत, सुमित पाटील, अनिकेत पाटील, अमन शेख, करण पाटील यांचा समावेश आहे. या संघाला प्रशिक्षक प्रदीप साळोखे, संतोष पवार, सूर्यदीप माने, शरद मेढे, अभिजित गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापुरातील विभागीय क्रीडासंकुल येथे झालेल्या म.न.पा.स्तर १९ वर्षांखालील शालेय फुटबॉल स्पर्धेत विजयी झालेल्या महाराष्ट्र हायस्कूलच्या संघासोबत मान्यवर उपस्थित होते.
मुलींमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात कमला कॉलेजने छत्रपती शाहू विद्यालयाचा १-० असा निसटता पराभव करीत विजेतेपद पटकाविले. हा विजयी गोल ‘कमला’कडून साक्षी सरनाईक हिने नोंदविला. विजयी संघात निकीता जाधव, वैष्णवी सुतार, शिवानी फडतारे, स्वाती रजपूत, प्रज्ञा नारे, राजलक्ष्मी सोलणकर, नाजनीन नायकवडी, ज्ञानेश्वरी ठोंबरे, अवंतिका कटकोळ, प्रतीक्षा रामाणे, कोमल कांबळे, प्रिया कणबरकर, आकांक्षा लाखे, इशा शिंगे, प्रशिक्षक रघू पाटील यांचा समावेश होता.
विजेत्या संघास शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्रा. अमर सासने, सचिन पांडव, प्रदीप साळोखे, सुनील पोवार, गौरव माने, योगेश हिरेमठ, श्रेयस मोरे, पंकज राऊत, आदी उपस्थित होते.