Maharashtra Karnataka Border Dispute: कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीविरोधात समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकरांचे अन्नत्याग आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 01:51 PM2022-12-19T13:51:57+5:302022-12-19T13:52:26+5:30

दरम्यान माजी आमदार मनोहर किनेकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे

Maharashtra Karnataka Border Dispute, Manohar Kinekar, working president of the committee protested against the oppression of the Karnataka police | Maharashtra Karnataka Border Dispute: कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीविरोधात समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकरांचे अन्नत्याग आंदोलन

Maharashtra Karnataka Border Dispute: कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीविरोधात समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकरांचे अन्नत्याग आंदोलन

Next

प्रकाश बेळगोजी  

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर होणाऱ्या महामेळाव्याला र गैर मार्गाने विरोध करून  कर्नाटक पोलिसांनी दडपशाही चालू केली आहे. परिसरात १४४ कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी करून मेळाव्याला परवानगी नाकारली. तसेच मेळाव्याच्या ठिकाणी येणाऱ्या नेते कार्यकर्त्यांचे अटकसत्र चालू केलं आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा उभा करून दशहतीचे वातावरण निर्माण केले आहे. महिला कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याची धरपकड सुरू असल्याने त्या घटनेचा निषेधार्थ माजी आमदार समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

कॅम्प महिला पोलिस स्थानकात माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, शिवानी पाटील यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. या शिवाय माजी आमदार किनेकर यांच्यासह कार्यकर्त्यांना ए.पी.एम.सी पोलिस स्थानकात ठेवण्यात आले आहे. मराठी बांधवांकडून याविरोधात जागोजागी निषेध म्हणून आंदोलन करीत आहेत. भवानी नगर येथे तालुका समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तर कंग्राळी खुर्द येथे सरस्वती पाटील यांनी तर  मराठा कॉलनीत खानापूर समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

दरम्यान माजी आमदार मनोहर किनेकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना संदेश देत घटनेची माहिती दिली आहे. नागपुरात सुरु असलेल्या महाराष्ट्र विधी मंडळाच्या अधिवेशनात या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत. 

विधानसभेत अजित पवार संतापले

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी  करुनही कर्नाटक सरकारच्या कुरापती सुरुच आहेत. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करुन लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम कर्नाटक सरकारने केले आहे. यापुढे कर्नाटक सरकारची दडपशाही सहन करणार नसल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची जोरदार मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Web Title: Maharashtra Karnataka Border Dispute, Manohar Kinekar, working president of the committee protested against the oppression of the Karnataka police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.