बालाच्या ‘महाराष्ट्र केसरी’मुळे आंदळकर वस्तादांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:10 AM2018-12-24T00:10:07+5:302018-12-24T00:10:12+5:30

कोल्हापूर : जालना येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविलेला बाला रफीक शेख मूळचा सोलापूर जिल्ह्यातील ...

'Maharashtra Kesari' honored with the contribution of the artist | बालाच्या ‘महाराष्ट्र केसरी’मुळे आंदळकर वस्तादांना आदरांजली

बालाच्या ‘महाराष्ट्र केसरी’मुळे आंदळकर वस्तादांना आदरांजली

Next

कोल्हापूर : जालना येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविलेला बाला रफीक शेख मूळचा सोलापूर जिल्ह्यातील खडकी गावचा रहिवासी असला तरी कुस्तीचे धडे त्याने गेल्या वर्षापर्यंत कोल्हापुरातील न्यू मोतीबाग तालीम येथे दिवंगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले आहेत. त्यामुळे या तालमीतील मल्लांनी बाला रफीक शेख याने ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा पटकावताच रविवारी सायंकाळी एकच जल्लोष केला. किताबाच्या रूपाने ‘बाला’ने आंदळकर वस्तादांना आदरांजली वाहिल्याची भावना मल्लांनी व्यक्त केली.
न्यू मोतीबाग तालीम येथे बाला रफीक वयाच्या चौदाव्या वर्षापासून सराव करीत होता. त्याने या तालमीत दिवंगत आंदळकर वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कुस्ती स्पर्धा गाजविल्या. त्या लढतींतील त्याची चुणूक एक दिवस त्याला ‘महाराष्ट्र केसरी’च्या गदेपर्यंत घेऊन जाईल, असा विश्वास त्याच्यासोबत सराव करणाऱ्या मल्लांनाही होता. विशेष म्हणजे आंदळकर वस्तादांनी त्याचा कल पाहून त्याला दुहेरी पट, हफ्ता, ढाक आणि दशरंगी डावांमध्ये पारंगत केले होते. त्याने उपांत्य फेरीतही माती गटात रत्नागिरीच्या संतोष दोरवडला याच ‘दशरंगी’ डावावर लोळवत विजय मिळविला. त्याने मॅट गटात पारंगत असलेल्या पुण्याच्या अभिजित कटकेवर रविवारी झालेल्या अंतिम लढतीत एकेरी पट काढून विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने विजय मिळविताच न्यू मोतीबाग तालमीतील त्याच्या सहकाºयांनी एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे यापूर्वी २००८, २००९ ला सलग दोन वर्षे याच तालमीचा पठ्ठा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलने हा किताब पटकाविला. त्यानंतर २०१० ला मल्ल नंदू आबदार याने ‘उपमहाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविला. त्यानंतर पुन्हा एकदा या न्यू मोतीबाग तालमीमध्ये महाराष्ट्र केसरीची गदा आणली गेली. त्यामुळे रविवारी येथील मल्लांनी एकच जल्लोष केला. यावेळी अनेकांनी त्याने मिळविलेले यश हे खºया अर्थाने दिवंगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांना आदरांजली असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे याच तालमीतील उपमहाराष्ट्र केसरी बाळू पाटील, संजय पाटील, नंदू आबदार, मारुती जाधव आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, अभिजित आंदळकर यांनी त्याला विशेष सहकार्य केले आहे.
यावेळी बाजीराव चौगुले, अनिल चव्हाण, सागर लाड, अक्षय पाटील, शंकर चौगुले, मारुती सूळ, सुनील जाधव, अजित पाटील, अविनाश पाटील, भरत लोकरे, सिद्धाप्पा होमणे, दत्ता होमणे, विकास पाटील, आदी मल्ल उपस्थित होते.

Web Title: 'Maharashtra Kesari' honored with the contribution of the artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.