महाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्सच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 04:07 AM2018-07-17T04:07:50+5:302018-07-17T04:07:54+5:30

महाराष्ट्र स्टेट को-आॅप. हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व राष्ट्रवादीचे नेते व्ही. बी. पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी औरंगाबादचे काँग्रेसचे सुनील जाधव यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली.

 Maharashtra State Housing Finance Chairman NCP B. Patil | महाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्सच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील

महाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्सच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील

Next

कोल्हापूर : महाराष्ट्र स्टेट को-आॅप. हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व राष्ट्रवादीचे नेते व्ही. बी. पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी औरंगाबादचे काँग्रेसचे सुनील जाधव यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक अधिकारी प्रशांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत संस्थेच्या मुख्यालयात संचालक मंडळाची सभा झाली.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांची नावे पाठविल्यावर या निवडी झाल्या. भाजपचे पाच संचालक आहेत; परंतु त्यांनी व्ही. बी. पाटील यांच्यासारख्या अनुभवी संचालकास हे पद मिळत असल्याने बिनविरोध निवडीस सहकार्य केले. व्ही. बी. पाटील हे संचालक म्हणूनही बिनविरोध निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते अत्यंत निकटवर्ती मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसने १२ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला चार, तर भाजपला पाच जागा मिळाल्या होत्या. या संस्थेची निवडणूक तब्बल ११ वर्षांनंतर यंदा १ जुलैला झाली.
>दिवंगत वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांच्या काळात जशी संस्थेची स्थिती होती तशी संस्था नावारूपाला आणण्याचा प्रयत्न करू.
- व्ही. बी. पाटील,
अध्यक्ष- महाराष्ट्र स्टेट को-आॅप. हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन मुंबई.

Web Title:  Maharashtra State Housing Finance Chairman NCP B. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.