महाराष्ट्राचा संघ जाहीर

By admin | Published: January 1, 2017 12:47 AM2017-01-01T00:47:44+5:302017-01-01T00:47:44+5:30

शालेय राष्ट्रीय खो-खो : सांगलीत २ जानेवारीपासून स्पर्धेस प्रारंभ

Maharashtra team released | महाराष्ट्राचा संघ जाहीर

महाराष्ट्राचा संघ जाहीर

Next

सांगली : सांगलीत होणाऱ्या ६२ व्या शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेसाठी बनवलेल्या चार राष्ट्रीय दर्जाच्या मैदानांच्या सपाटीकरणाचे काम गतीने सुरू आहे. महाराष्ट्राचे मुले व मुली हे दोन्ही संघ जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले यांनी जाहीर केले.
निसर्गाच्या हिरवाईची लकेर उमटलेले शांतिनिकेतन ‘खो-खो’मय झाले आहे. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना देशभरातून आलेले खेळाडू मानवंदना देणार आहेत. त्यासाठी विशेष पोलिस बँडला निमंत्रित केले आहे.
स्पर्धास्थळापर्यंत ये-जा करण्यासाठी लोटस क्लबने खेळाडूंसाठी खास वाहनांची सोय केली आहे. निवास व भोजनाची सोय शांतिनिकेतन संस्थेने केली आहे.
लोटस स्पोर्टस् क्लबचे शंभरभर खेळाडू स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी राबत आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले यांनी आज स्पर्धास्थळाची पाहणी केली. यावेळी शांतिनिकेतनचे उपसंचालक गौतम पाटील, लोटस क्लबचे सचिव दीपक सूर्यवंशी, डॉ. अमित शेख, राष्ट्रीय प्रशिक्षक प्रशांत पवार, डॉ. समीर शेख, सुहास व्हटकर, सुरेखा पुजारी, संजय खांडेकर, जीवन मोहिते आदी उपस्थित होते. उद्या २ जानेवारीपासून स्पर्धेस प्रारंभ होणार आहे.
देशभरातील विविध राज्यांचे संघ रविवार, १ जानेवारीपासून सांगलीत दाखल होतील. १९ वर्षाखालील मुले व मुली गटात या स्पर्धा होतील. शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धा घेण्याचा बहुमान सांगलीला प्रथमच मिळाला आहे. विद्युतझोतात या स्पर्धा होणार आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)


मुला-मुलींचा संघ असा
मुले : संकेत कदम (ठाणे), तेजस मगर (अहमदनगर), निखिल वाघे (ठाणे), प्रथमेश शेळके (सांगली), सागर लेंगरे (सोलापूर), अरूण गुणकी (सांगली), प्रतीक बांगर (पुणे), अनिकेत आणेराव (मुंबई उपनगर), राजीव फुलमाळी (पुणे), निरंजन ढाके (जळगाव), अविनाश मते (उस्मानाबाद), युगल मेटांगळे (नागपूर). राखीव : आकाश तोरणे (ठाणे), सत्यजित सावंत (सांगली), राहुल पवार (सोलापूर), अभिषेक पवार (अहमदनगर), ओंकार खंडागळे (सातारा).
मुली : अपेक्षा सुतार (रत्नागिरी), प्रणाली बेनके, काजल भोर (दोघी पुणे), करिष्मा रिकीबदार, सन्मती कोले (दोघी कोल्हापूर), तेजश्री कोंढाळकर (ठाणे), ऋतुजा खाडे (कोल्हापूर), प्रियांका भोपी, पूजा डांगे (दोघी ठाणे), तेजस्विनी जाधव (जळगाव), पुजा साळुंखे (औरंगाबाद), सुप्रिया घुगरे (यवतमाळ). राखीव : पल्लवी मरडी (कोल्हापूर), वैष्णवी भड (उस्मानाबाद), आरती कदम (मुंबई उपनगर), पल्लवी इंबडे (सातारा), दीक्षा कदम (ठाणे).

Web Title: Maharashtra team released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.