Maharashtra Vidhan Sabha 2019: 'बाळासाहेब हे दैवत; उमेदवारी मिळाली नाही तरी बंडखोरी करणार नाही!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 01:24 PM2019-09-20T13:24:17+5:302019-09-20T13:27:36+5:30

बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत आहेत.अडचणीच्या काळात आपण शिवसेनेतून कागल विधानसभा लढवली आहे. आतापर्यंत आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत.त्यामुळे या वेळी ही कागल मधून सेना भाजपा युतीच्या उमेदवारी साठी आग्रही आहे.आणि उमेदवारी मिळण्यात कोणतीही अडचण नाही पण तरीही काही वेगळा निर्णय झाला तरी आपण युती धर्म पाळून पक्षाचा आदेश अंतिम मानेन जर युतीची उमेदवारी मिळाली तरच आपण किंवा अमरीश रिंगणात राहू अन्यथा आपण निवडणूक लढणार नाही असे स्पष्ट मत माजी आमदार संजय घाटगे यांनी दिले.

Maharashtra Vidhan Sabha 2019: If I do not get Shiv Sena ticket, I will not contest election, says sanjay ghatge | Maharashtra Vidhan Sabha 2019: 'बाळासाहेब हे दैवत; उमेदवारी मिळाली नाही तरी बंडखोरी करणार नाही!'

Maharashtra Vidhan Sabha 2019: 'बाळासाहेब हे दैवत; उमेदवारी मिळाली नाही तरी बंडखोरी करणार नाही!'

googlenewsNext
ठळक मुद्दे'बाळासाहेब हे दैवत; उमेदवारी मिळाली नाही तरी बंडखोरी करणार नाही!'संजयबाबा घाटगे मुरगूड मधून फुंकणार रणसिंग

मुरगूड : बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत आहेत.अडचणीच्या काळात आपण शिवसेनेतून कागलविधानसभा लढवली आहे.आतापर्यंत आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत.त्यामुळे या वेळी ही कागल मधून सेना भाजपा युतीच्या उमेदवारी साठी आग्रही आहे.आणि उमेदवारी मिळण्यात कोणतीही अडचण नाही पण तरीही काही वेगळा निर्णय झाला तरी आपण युती धर्म पाळून पक्षाचा आदेश अंतिम मानेन जर युतीची उमेदवारी मिळाली तरच आपण किंवा अमरीश रिंगणात राहू अन्यथा आपण निवडणूक लढणार नाही असे स्पष्ट मत माजी आमदार संजय घाटगे यांनी दिले.

शिवसेनेचा महाराष्ट्रातील पहिला मी महाराष्ट्र निश्चय मेळावा मुरगूड ता कागल येथे पार पडणार आहे याची माहिती देण्यासाठी येथील नगरपालिका कार्यालयात ही पत्रकार परिषद संपन्न झाली.

या कार्यक्रमासाठी मुंबई येथील सेना भवनातून एक टीम मुरगूड मध्ये आली असून या निश्चय मेळाव्यातून शिवसेना विधानसभेचे रणसिंग फुंकणार आहे.आणि हा मेळावा कागल तालुक्यातील मुरगूड मध्ये पार पडणार असल्याने कागल ची उमेदवारी सेनेलाच मिळणार असल्याचे संकेत या पत्रकार परिषदेत दिसत होते.तसा पक्षाने ग्रीन सिग्नल दिल्याचे ही संजय घाटगे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना संजय घाटगे म्हणाले आपल्या वंचित आघाडीशी संपर्क झाल्याची बातमी तशी खोडकर च होती.असा कोणताही संपर्क झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आदित्य ठाकरे हेच महाराष्ट्राचे भवितव्य आहे.त्यामुळे उमेदवारी मिळो अगर न मिळो आपण शिवसेना सोडण्याच्या प्रश्नच येत नाही असे त्यांनी सांगितले.

जर भाजपा सेना युती झाली नाही तर पक्षाने जबाबदारी दिली तर आपण खासदार संजय मंडलिक यांच्या सहकार्याने सेनेकडून लढणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.तर युती कडून आपल्याला उमेदवारी मिळाली तर भाजपकडून इच्छुक असणारे समरजीत घाटगे यांची समजूत काढण्यात वरिष्ठ नेते यशस्वी होतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

वरिष्ठ नेत्यांना आणून उमेदवारी मिळावी यासाठी आपण कधीच प्रचंड पैसा खर्च केला नसता आणि करणार नाही कारण आमचे दैवत सर्वसामान्य जनता आहे त्यांचा उत्कर्ष महत्वाचा आहे संस्थेचा पैसा हा संस्थेसाठी किंवा जनतेसाठीच खर्च होणे अपेक्षित आहे राजकारणावर खर्च होणे हे आपल्याला पटत नाही असे सांगून कागल मध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांची त्यांनी खिल्ली उडवली.मागील निवडणुकीत भाजपला तालुक्यात पाच हजार मते पडली आणि आम्हाला साधारण सव्वालाख मते पडली त्यामुळे पक्ष नेतृत्वाला याची माहिती असल्याने कागलची जागा आम्हालाच मिळेल असे सांगून मी काय अमरीश याचा निर्णय पक्ष प्रमुख ठाकरेंच घेतील असे त्यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशा नुसार रविवारी होणाऱ्या मुरगुड मधील मेळाव्यात नितीन बानूगडे पाटील हे प्रमुख वक्ते असतील तर खासदार संजय मंडलिक हे अध्यक्ष असतील जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सेने चे सर्व नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार असून मुरगूड विद्यालयाच्या जवळ हा मेळावा सांयकाळी चार वाजता पार पडणार आहे.

 स्वागत नामदेवराव मेंडके यांनी केले.यावेळीअमरीश घाटगे, उपनगराध्यक्ष धनाजी गोधडे, जयसिंग भोसले,धनराज घाटगे,ए.वाय. पाटील,अशोक पाटील,के.के.पाटील, एम.बी.पाटील,महेश देशपांडे,दिलीप पाटील,पंडित बोभाटे, महेश पाटील,रणजित शिंदे,सुशांत पाटील,आदी प्रमुख उपस्थित होते.

 मुरगूड ता.कागल येथे बोलताना माजी आमदार संजय घाटगे,उपनगराध्यक्ष धनाजी गोधडे, नामदेवराव मेंडके, धनराज घाटगे आदी प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019: If I do not get Shiv Sena ticket, I will not contest election, says sanjay ghatge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.