Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 03:33 PM2024-11-14T15:33:55+5:302024-11-14T15:35:49+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'बाबत आता कोल्हापुरातील आणखी एका महिला नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यभरात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा सुरू आहेत. महायुतीने आणलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची' राज्यभर चर्चा सुरू आहे. या योजनवरुन भाजपा खासदार धनंजय महाडिक यांनी काही दिवसापूर्वी वादग्रस्त विधान केले होते. दरम्यान, आता कोल्हापुरातून आणखी एक या संदर्भात बातमी समोर आली आहे. कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी एका सभेत १५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार, असं वादग्रस्त विधान केले आहे.
शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेद्वारे महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत. महायुतीच्या या योजनेची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीतही ही योजना फायद्याची ठरत आहे. तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील एका सभेत वादग्रस्त विधान केले होते. आता पुन्हा एकदा कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
करवीर पन्हाळा गगनबावडा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ गारीवाडे या गावातील जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे विधान केले. महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव म्हणाल्या, १५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार अस वक्तव्यं केलं आहे. या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
धनंजय महाडिकांनीही केले होते वादग्रस्त विधान
एका सभेत बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो, असे वक्तव्य महाडिक यांनी केले आहे. ''जर इथे काँग्रेसची रॅली निघाली आणि त्यामध्ये आपल्या योजनेचे १५०० रुपये घेतात त्या महिला दिसल्या त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या. घ्यायचे आपल्या शासनाचे आणि गायचे त्यांचे असे नाही चालणार'', असे दम महाडिक यांनी भरला आहे. भर सभेमध्ये महाडिक यांचे हे वक्तव्य आलेले आहे.
"1500 दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर 3000 वसुल करणार... "
— Adv. Pradnya Pawar (@PradnyaPawar121) November 14, 2024
ह्या हरामखोर मिंदे सरकारच्या नेत्यांची मस्ती पहा. ह्यांची ही मस्ती मोडून काढावी लागेल. भाजप महायुतीचा पराभव करुन महाविकास आघाडीची सत्ता आणावी लागेल.#भाजप_हटाओ_महाराष्ट्र_बचाओ#AntiMaharashtraBJP#BJPhataoDeshBachaopic.twitter.com/xK9OsIdmXE